Kareena Kapoor Khan च्या छोट्या मुलाचे नाव Jeh; रणधीर कपूर यांच्याकडून शिक्कामोर्तब

मात्र यात नेमके कितपत तथ्य आहे, याचा उलघडा झाला नव्हता.

Kareena Kapoor Khan & Randhir Kapoor (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) आणि अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) यांनी त्यांच्या दुसऱ्या मुलाचे नवा 'जे' (Jeh) ठेवल्याच्या चर्चा कालपासून सोशल मीडियावर होत आहेत. मात्र यात नेमके कितपत तथ्य आहे, याचा उलघडा झाला नव्हता. परंतु, आता याबाबतचा खुलासा झाला आहे. करीना आणि सैफने आपल्या दुसऱ्या बाळाचे नाव 'जे' असे ठेवले आहे. यावर करीनाचे वडील रणधीर कपूर (Randhir Kapoor) यांनी शिक्कामोर्तब केला आहे. रणधीरने टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले की, "करीना आणि सैफच्या दुसऱ्या बाळाला आम्ही सर्व जे म्हणून आवाज देतो."

रणधीर कपूर यांनी पुढे सांगितले की, "मागील आठवड्यातच त्याचे नाव ठेवण्यात आले. त्यानंतर संपूर्ण कुटुंबिय त्याला जे नावाने बोलावतात." (Kareena Kapoor चे प्रेग्नेंसीवरील पुस्तक Pregnancy Bible लॉन्च, Watch Video)

करीनाने फेब्रुवारी 2021 मध्ये आपल्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला. त्यानंतर करीना आणि सैफ यांनी त्याला मीडियापासून दूर ठेवले आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावरही त्याचे फोटोज शेअर करणे टाळत आहेत. त्यामुळे जे ची झलक अजून चाहत्यांना पाहायला मिळालेली नाही. दरम्यान, तैमुरच्या जन्माच्या वेळी मीडियावर कोणतीही बंधनं नव्हती. त्यामुळेच कदाचित तैमूर प्रसारमाध्यमातून अगदी अल्पावधीत प्रसिद्ध झाला. लोकप्रिय स्टार किड्सपैकी तैमूर एक आहे. दरम्यान, तैमुरच्या नावावरुन वादंग निर्माण झाला होता.

करीना आणि सैफ हे काही काळ लिव्ह-इन-रिलेशनशीपमध्ये राहत होते. त्यानंतर त्यांनी 2012 मध्ये लग्नगाठ बांधली. डिसेंबर 2016 मध्ये तैमूरचा जन्म झाला. त्यानंतर 4 वर्षांनी दुसरा मुलगा जे त्यांच्या आयुष्यात आला.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif