Kareena Kapoor Khan चा बेबी बंपसह शानदार डान्स; पहा Cute Video
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) सध्या आपली दुसरी प्रेग्नेंसी एन्जॉय करत आहे. प्रेग्नेंसी दरम्यानचे पोटोज आणि व्हिडिओज शेअर करुन ती चाहत्यांचे मनोरंजन करत असते.
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) सध्या आपली दुसरी प्रेग्नेंसी एन्जॉय करत आहे. प्रेग्नेंसी दरम्यानही तिचा अपूर्ण कामे पूर्ण करण्यावर भर आहे. सोशल मीडियावर देखील ती भलतीच अॅक्टीव्ह असते. प्रेग्नेंसी दरम्यानचे पोटोज आणि व्हिडिओज शेअर करुन ती चाहत्यांचे मनोरंजन करत असते. अलिकडेच करीनाने एक व्हिडिओ इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. त्यात ती आनंदाने नाचताना दिसत आहे. करीना कपूरचा हा क्यूट व्हिडिओ (Cute Video) सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
करीना कपूर खान ने शेअर केलेल्या व्हिडिओत तिच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंसी ग्लो दिसत आहे. त्यात तिने नारंगी आणि काळ्या रंगाचा फूल टी शर्ट आणि क्रिम रंगाचा स्कर्ट परिधान केला आहे. आनंदाने नाचणारी करीना चाहत्यांना प्रचंड भावली आहे. या व्हिडिओद्वारे करीना प्युमाची जाहीरात करत आहे. करीनाच्या या व्हिडिओला काही मिनिटांतच 90 हजाराहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
पहा व्हिडिओ:
करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांनी आपल्या येणाऱ्या बाळाच्या स्वागतासाठी मुंबईत आलिशान घर खरेदी केले आहे. हे घर करीन स्वत: इंटिरियर डिजाईनर्स सोबत सजवत आहे. या नव्या घरात टेरेस, स्विमिंग पूल, लायब्रेरी आणि आऊटडोअर एरिया सोबतच तैमुरसाठी खास रुम सजवण्यात आली आहे. (Kareena Kapoor दुसऱ्या मुलासाठी बनवतेय आपले Dream Home पहा फोटो)
प्रेग्नेंसीदरम्यान करीना कपूर खूपच अॅक्टीव्ह असून काही दिवसांपूर्वी तिच्या योगाच्या फोटोशूटने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. यामुळे अनेकांना प्रेरणा मिळाली असेल हे नक्की. दरम्यान, करीनाने गरोदरपणाचा अनुभव शेअर करणार पुस्तकही लॉन्च केलं आहे. पुढच्या महिन्यात ती आपल्या दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे.