Sushant Singh Rajput Death Controversy: अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्येनंतर करण जौहर चे इन्स्टाचे तब्बल 10 लाख फॉलोअर्स झाले कमी तर कंगना रनौतच्या च्या फॉलोअर्समध्ये झाली 'इतकी' वाढ
ज्यामुळे केवळ 20 मिनिटांमध्ये करणचे 10 लाख इन्स्टा फॉलोअर्स कमी झाले. “गेल्या वर्षभरापासून मी तुझ्या संपर्कात नव्हतो. या गोष्टीचा मला खेद आहे.” अशा आशायाची पोस्ट लिहून करणने सुशांतला श्रद्धांजली दिली होती.
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील गढूळ झालेले वातावरण, राजकारण याबाबत अनेक चर्चांना उधाण आलं आहे. नेपोटिझम मुळे सुशांतला आत्महत्येचे पाऊल उचलावे लागले हा मुद्दा त्याच्या चाहत्यांनी उचलून धरल्यामुळे अनेक बॉलिवूडकरांनीही या गोष्टीला दुजोरा दिला आहे. यात सर्वाधिक दोष करण जौहरला (Karan Johar) देण्यात आला. नेटक-यांनी केलेली ही टीका करणला चांगलीच भोवली असून यामुळे करणचे इन्स्टाग्रामवरील तब्बल 10 लाख फॉलोअर्स कमी झाले. तर दुसरीकडे कंगना रनौत Kangana Ranaut) ने नेपोटीझम वर भाष्य करत बॉलिवूड घराणेशाहीवर सडकून टीका केली आहे. यामुळे तिच्या फॉलोअर्समध्ये जबरदस्त वाढ झाली आहे.
14 जूनला सकाळी अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येची बातमी वा-याच्या वेगासारखी पसरली. ही बातमी कळताच सर्व बॉलिवूडकरांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त केला. मात्र यावेळी दिग्दर्शक करण जौहर यांनी इन्स्टाग्रावर केलेली पोस्ट मात्र त्याच्या चांगलीच अंगलट आली आहे. ज्यामुळे केवळ 20 मिनिटांमध्ये करणचे 10 लाख इन्स्टा फॉलोअर्स कमी झाले. “गेल्या वर्षभरापासून मी तुझ्या संपर्कात नव्हतो. या गोष्टीचा मला खेद आहे.” अशा आशायाची पोस्ट लिहून करणने सुशांतला श्रद्धांजली दिली होती. मात्र ही पोस्ट नेटकऱ्यांनी आवडली नाही. करण जौहर नेपोटिझमला प्रोत्साहन देतो अशी अनेकांनी त्याच्यावर टीका केली आहे. यापूर्वी त्याला इन्स्टावर 1 कोटी 10 लाख लोकं फॉलो करत होते. मात्र आता हा आकडा 1 कोटींवर आला आहे.
करण जौहरच्या सोशल पोस्टचा हा परिणाम झाला असून दुसरीकडे अभिनेत्री कंगना रनौत ने नेपोटिझम केलेल्या सडेतोड वक्तव्यामुळे अनेकांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. या संदर्भातला एक व्हिडिओ कंगनाने पोस्ट केल्यानंतर कंगनाचे इन्स्टावरील फॉलोअर्स काही तासांमध्ये 12 लाखाने वाढले. यापूर्वी तिचे 20 लाख फॉलोअर्स होते जे आता 32 लाख इतके झाले आहे.
दरम्यान, डिप्रेशनमुळे सुशांतने आत्महत्या केली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र इतकी प्रसिद्धी, पैसा मिळूनही सुशांत एकटा होता, ही गोष्ट अनेकांच्या मनाला लागली आहे. यानंतर इंडस्ट्रीमधील एक विदारक सत्य समोर येत आहे. अनेक कारणास्तव लोक एकमेकांशी बोलत नाहीत, बाहेरच्या कलाकारांना एकटे पाडले जात आहे, याच मुद्द्यावर सध्या चर्चा रंगत आहे.