Most Popular Non Fiction Personalities: कपिल शर्माची चालली जादु, सलमान खानला मागे ठेवत ठरला सर्वाधिक लोकप्रिय
ओरमॅक्स मीडियाने ही यादी जाहीर केली आहे. सध्या कपिल शर्मा लोकप्रियतेत सलमान खान आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांसारख्या सेलिब्रिटींच्या पुढे दिसत आहे. साहजिकच त्याला ही लोकप्रियता त्याच्या 'द कपिल शर्मा शो' या लोकप्रिय शोमुळे मिळाली.
ओरमॅक्स मीडियाने (Ormax Media) सोशल मीडियावर टॉप 5 'मोस्ट पॉप्युलर नॉन-फिक्शन पर्सनॅलिटी'ची (Most Popular Non Fiction Personalities) यादी शेअर केली आहे. त्यांनी ट्विट (Tweet) केले, 'हिंदी टेलिव्हिजनमधील सर्वात लोकप्रिय नॉन-फिक्शन व्यक्तिमत्त्व (Dec 2021) ठरवले आहे. ' ही अशी व्यक्तिमत्त्वे आहेत ज्यांना हिंदी टेलिव्हिजनच्या प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळाले आहे. हिंदी टेलिव्हिजनच्या सर्वाधिक लोकप्रिय सेलिब्रिटींच्या यादीत सलमान खानला (Salman Khan) दुसरे स्थान मिळाले आहे. कपिल शर्माने (kapil Sharma) पहिल्या स्थानावर येऊन सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. ओरमॅक्स मीडियाने ही यादी जाहीर केली आहे. सध्या कपिल शर्मा लोकप्रियतेत सलमान खान आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांसारख्या सेलिब्रिटींच्या पुढे दिसत आहे. साहजिकच त्याला ही लोकप्रियता त्याच्या 'द कपिल शर्मा शो' या लोकप्रिय शोमुळे मिळाली.
Tweet
या यादीत कपिल शर्माला पहिले स्थान मिळाले आहे. सलमान खानला दुसरे स्थान मिळाले. अमिताभ बच्चन तिसऱ्या स्थानावर आहेत, तर 'बिग बॉस 15' ची प्रसिद्ध जोडी तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहे. कपिलने लोकप्रियतेच्या बाबतीत सलमान खानसारख्या स्टारला मागे टाकत सर्व प्रेक्षकांना चकित केले आहे. (हे ही वाचा Lata Mangeshkar Health Update: लता मंगेशकर यांना Recover होण्यासाठी वेळ लागणार: Dr Pratit Samdani यांची माहिती)
अमिताभ बच्चन तिसऱ्या क्रमांकावर
ओरमॅक्स मीडियाने (Ormax Media) रेटिंग एजन्सीने काल 16 डिसेंबर रोजी ही यादी ट्विट केली होती. अमिताभ बच्चनसारखे मेगा स्टार तिसऱ्या क्रमांकावर आहेत, जे त्यांच्या 'कौन बनेगा करोडपती' शोमुळे चर्चेत राहिले. या यादीत आपल्या आवडत्या स्टार्सना पाहून नेटिझन्स खुप खुश झाले आहेत. मात्र काही लोक ओरमॅक्स मीडियाच्या रेटिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)