The Kapil Sharma Show या विनोदी कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती (Sumona Chakravarti) ही आपल्या अभिनयासोबत सोशल मीडियावरील आपल्या बोल्ड फोटोमुळेही चर्चेत असते. सोशल मीडियावर प्रचंड कार्यरत राहिल्यामुळे सोशल मीडियावर तिच्या फॅन फॉलोअर्स संख्येतही कमालीची वाढ पाहायला मिळते. सुमोना चक्रवर्ती सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिने शेअर केलेल्या एका बिकीनी फोटोमुळे ती सध्या जोरदार चर्चेत आहे. या बिकीनी फोटोमध्ये (Sumona Chakravarti Bikini Photo) ती टॅटू फ्लॉन्ट करताना दिसते आहे.
प्रसारमाध्यमांनी दिलेले वृत्त असे की, सुमोना चक्रवर्ती सध्या आपल्या व्यग्र कामकाजातून स्वत:ला काहीसे मोकळे करत थायलंड दौऱ्यावर आहे. थायलंड येथे ती खास सुट्टी साजरी करण्यासाठी गेली आहे. थायलंड सफरीवरील एक खास फोटो सुमोना हिने सोशल मीडियवर शेअर केला आहे. हा फोटो बिकीनीतील असून, सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांनी तिचे प्रचंड कौतुक केले आहे. काही चाहत्यांनी त्यावर खवचट प्रतिक्रिया देत टीकाही केली आहे. (हेही पाहा, Sakshi Chopra Sexy Photos: अरारारा जबरदस्त! Sakshi Chopra बिकीनी फोटो पाहिले? मादक अदांवर चाहते फिदा)
सुमोना चक्रवर्ती साडी फोटो (इन्स्टाग्राम)
सुमोना हिने सोशल मीडियावर (इन्स्टाग्राम) शेअर केलेल्या बिकीनी फोटोमध्ये ती टॅटू फ्लॉन्ट करताना दिसते.
सुमोना चक्रवर्ती बिकीनी फोटो (इन्स्टाग्राम)
दरम्यान, या आधी सुमोना हीने साडीमधील एक फोटो शेअर केला होता. ब्लू रंगाच्या साडीत अतिशय सुंदर दिसत होती.
सुमोना चक्रवर्ती फोटो (इन्स्टाग्राम)
सुमोना चक्रवर्ती हिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला भेट दिली असता तिचे अत्यंत हॉट आणि तिचकोच बोल्ड पाहायला मिळतात. यातील काही फोटो पारंपरीक वेशात दिसतात तर, काही फोटो अत्यंत भडक अशा रुपात वेस्टर्न अवतारात दिसतात. तिच्या फोटोखाली चाहत्यांच्या प्रतिक्रियाही मोठ्या प्रमाणावर देत असतात. तिचे फोटो लाईक करणाऱ्या युजर्सची संख्याही मोठी आहे.