Kapil Sharma अखेर आपल्या मुलाचे नाव केले जाहीर, Neeti Mohan च्या प्रश्नाला उत्तर देत नावावारून उठवला पडदा
त्याने सोशल मिडियावर ही बातमी आपल्या सर्व चाहत्यांना दिली. मात्र त्याने आपल्या मुलाचे नाव मात्र गुलदस्त्यातच ठेवले होते.
विनोदवीर कपिल शर्माचा (Kapil Sharma) याचा 2 एप्रिलला वाढदिवस झाला. आपल्यान निखळ विनोदाने लोकांना पोट धरून हसायला लावून लोकांचे मनोरंजन करणा-या कपिलवर जगभरातून चाहत्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सोशल मिडियाद्वारे अनेकांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्याच्या मित्रपरिवाराने देखील त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी गायिका नीति मोहन (Neeti Mohan) हिने कपिलला "आता तरी मुलाचे नाव सांगशील का" असा प्रश्न विचारला. त्यावर अखेर उत्तर देऊन कपिलने आपल्या मुलाचे नाव घोषित केले आहे. फेब्रुवारी महिन्यात कपिल आणि त्याची पत्नी गिन्नीला पुत्ररत्नाचा लाभ झाला. त्याने सोशल मिडियावर ही बातमी आपल्या सर्व चाहत्यांना दिली. मात्र त्याने आपल्या मुलाचे नाव मात्र गुलदस्त्यातच ठेवले होते.
नीति मोहनने कपिलला मुलाचे नाव विचारल्यावर "माझ्या मुलाचे नाव त्रिशान आहे" असे कपिललने सांगितले. ट्विटद्वारे त्याने ही माहिती दिली. त्याने आपल्या मुलाचे नाव जाहीर करताच अनेकांनी त्याचे अभिनंदन केले. तसेच नीतिनेही त्याचे अभिनंदन केले. हेदेखील वाचा- Dia Mirza होणार आई! सोशल मीडियाद्वारे शेअर केली गुडन्यूज
गायिका नीति मोहन हिने ट्विटरवरून कपिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. "हॅपी बर्थडे डियर कपिल पाजी. तुला आणि तुझ्या कुटुंबियांसाठी खूप सारं प्रेम. आता तरी मुलाचं नाव सांगा" असं ट्विट तिने केलं होतं. यावर "धन्यवाद नीति आशा आहे तू तुझी काळजी घेत असशील. आम्ही मुलाचं नाव त्रिशान ठेवलं आहे." असे उत्तर कपिलने दिले. 'त्रिशान' हे भगवान कृष्णाचे नाव आहे.
नीति मोहन हे देखील गरोदर असून आई होण्याच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे कपिलनेदेखील तिला स्वत:ची काळजी घेण्यास सांगितले.