Kapil Sharma New Film: कपिल शर्माच्या नव्या चित्रपटाची घोषणा, नंदिता दाससोबत करणार काम

कपिल शर्मा त्याच्या या नव्या प्रोजेक्टबद्दल खूप खूश आहे. नंदिता दासच्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारायला मिळत असल्याने मी आनंदी आहे, असे तो म्हणाला. या चित्रपटात कपिल शर्मा यापूर्वी कधीही न पाहिलेल्या अवतारात दिसणार आहे.

Kapil Sharma New Film: कपिल शर्माच्या नव्या चित्रपटाची घोषणा, नंदिता दाससोबत करणार काम
Kapil Sharma (Photo Credits: Instagram)

सगळ्याना नेहमी खळखळून हसवणार कपिल शर्माने (Kapil Sharma) त्याच्या नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. लेखक-दिग्दर्शक-निर्मात्या नंदिता दास (Nandita Das) याच्या आगामी चित्रपटासाठी कॉमेडी किंग कपिल शर्मा मुख्य भुमिका साकरताना दिसणार आहे. या चित्रपटात कपिल शर्मा कधीही न पाहिलेल्या अवतारात दिसणार आहे जिथे तो डिलिव्हरी फूड रायडरच्या भूमिकेत दिसणार आहे. कपिल शर्मासोबत अभिनेत्री शहाना गोस्वामी (Shahana Goswami) या चित्रपटात त्याच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाची निर्मिती अ‍ॅप्लॉज एंटरटेनमेंट आणि नंदिता दास इनिशिएटिव्हज यांनी केली आहे. या महिन्याच्या अखेरीस भुवनेश्वर, ओडिशात चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे.

चित्रपटात साकारणार मुख्य भूमिका

कपिल शर्मा त्याच्या या नव्या प्रोजेक्टबद्दल खूप खूश आहे. नंदिता दासच्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारायला मिळत असल्याने मी आनंदी आहे, असे तो म्हणाला. या चित्रपटात कपिल शर्मा यापूर्वी कधीही न पाहिलेल्या अवतारात दिसणार आहे. कपिल शर्मा त्याच्या नवीन चित्रपटात फूड डिलिव्हरी रायडरच्या भूमिकेत दिसणार आहे. कपिल शर्मासोबत अभिनेत्री शहाना गोस्वामी दिसणार आहे. या चित्रपटात शाहाना कपिल शर्माच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma)

नंदिता दास यांनी आपल्या करिअरमध्ये 10 भाषांमधील 40 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनयासोबतच दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी ठसा उमटवला. 'मंटो' या बायोपिकच्या दिग्दर्शनासाठी नंदिता रायचे खूप कौतुक झाले होते. (हे ही वाचा

दुसरीकडे, कपिल शर्माच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, कपिलने अब्बास मस्तानच्या 'किस किसको प्यार करूं' या कॉमेडी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये त्याच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. यानंतर तो 'फिरंगी' आणि 'इट्स माय लाइफ' सारख्या चित्रपटातही दिसला. सध्या तो त्याच्या टीव्ही शो द कपिल शर्मा शोमध्ये व्यस्त आहे.

 

(The above story first appeared on LatestLY on Feb 17, 2022 05:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).