'मणिकर्णिका' सिनेमा वादावरुन कंगना रनौतकडून करणी सेनेला खुलेआम आव्हान, असे काही म्हणाली...
मात्र कंगना रनौत हिने करणी सेनेला सडेतोड उत्तर दिले आहे.
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) हिचा चित्रपट झाशीची राणी लक्ष्मीबाई (Rani of Jhansi) यांच्या आयुष्यावर आधारित 'मणिकर्णिका'(Manikarnika)चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तत्पपूर्वी करणी सेनेकडून 'पद्मावत' चित्रपटावेळी विचारण्यात गेलेल्या प्रश्नांचे भांडार पुन्हा एकदा उपसले आहे. मात्र कंगना रनौत हिने करणी सेनेला सडेतोड उत्तर दिले आहे. राजपूत समूहातील करणी सेना कंगानाचा 'मणिकर्णिका: द क्विन ऑफ झासी' चित्रपटावरुन त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. मणिकर्णिका हा चित्रपट येत्या आठवड्यात शुक्रवारी (25 जानेवारी) सिनेमागृहात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
या चित्रपटासाठी सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन यांच्याकडून प्रमाणपत्र देऊ केले आहे. त्यामुळे करणी सेनेला आव्हान देत कंगनाने असे म्हटले आहे की, 'मी सुद्धा एक राजपूत आहे आणि जर चित्रपट प्रदर्शित करताना कोणी मध्ये आल्यास त्यांनी मी चांगला धडा शिकवीन'. या चित्रपटासाठी चार इतिहासकारांनी प्रमाणपत्र देऊ केले आहे. तसेच सेन्सॉर बोर्डकडून ही संमती देण्यात आलेली आहे. याबाबतीत चित्रपटातील संबंधित लोकांनी करणी सेनेला सांगून ही या सेनेतील लोक आम्हाला त्रास देत आहेत. या सेनेला माहिती नसेल तर, 'मी सुद्धा एक राजपूत आहे आणि त्रास दिल्यास चांगलाच धडा शिकवीन' असे खडे बोल तिने सेनेला सुनावले आहेत. (हेही वाचा-'मणिकर्णिका' सिनेमासाठी कंगना रानौतने घेतले 'इतके' मानधन ; दीपिका, प्रियंकालाही टाकले मागे)
'मणिकर्णिका' सिनेमाची कथा राणी लक्ष्मीबाई यांच्या आयुष्यावर आधारित आहे. ज्यांनी ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध 1857 मधील युद्धात मोलाचे कार्य केले आहे. तर करणी सेनेने या चित्रपटातील राणी लक्ष्मीबाई यांचे व्यक्तिमत्व चुकीच्या पद्धतीने दाखविले गेले आहे. तसेच ब्रिटिशांच्या बाबतीत लक्ष्मीबाईंपेक्षा त्यांचेच गोडवे गायले जात असल्याने याचे परिणाम वाईट होतील असा इशारा दिला आहे.