Kangana Ranaut to Return to Mumbai: '9 सप्टेंबरला येत आहे मुंबईत, कोणाच्या बापाची हिम्मत असेल तर अडवून दाखवा'-अभिनेत्री कंगना रनौत
सध्या लॉकडाऊनच्या काळात तर कंगनाची अनेक वक्यव्ये सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय राहिली आहेत.
बॉलिवूडची 'पंगा क्वीन' कंगना रनौत (Kangana Ranaut) नेहमीच तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. सध्या लॉकडाऊनच्या काळात तर कंगनाची अनेक वक्यव्ये सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय राहिली आहेत. सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्यू प्रकरणात कंगनाने स्पष्टपणे बॉलीवूडमधील अनेकांची पोलखोल केली आहे. आता कंगनाने एका नवीद वादाला तोंड दिले आहे. मुंबईचा (Mumbai) ‘पाकिस्तान व्याप्त काश्मीर’ (POK) असा उल्लेख करून ती अडचणीत आली आहे. कंगनाच्या या ट्वीटनंतर महाराष्ट्रामधून तिच्यावर कडाडून टीका होत आहे. आता कंगनाने सांगितले आहे की, 9 सप्टेंबर रोजी ती मुंबईत येत आहे. जर कोणाच्या बापाची हिम्मत असेल तर मला अडवून दाखवा, असेही ती म्हणाली आहे.
तर या वादाला सुरुवात झाली होती ती कंगनाच्याच एका ट्वीटमुळे. याआधी कंगनाने ट्वीट केले होते की, तिला 'मूव्ही माफिया' पेक्षा मुंबई शहरातील पोलिसांची जास्त भीती वाटत आहे. त्यावर खासदार व शिवेसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी, ‘इतकीच जर भीती वाटत असेल मुंबईला येऊ नको’, असा टोला लगावला होता. त्यानंतर राऊत यांच्या ट्वीटबाबतच्या ‘इंडिअन एक्स्प्रेस’च्या बातमीचा हवाला देत कंगनाने म्हटले होते की, ‘शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला खुली धमकी दिली आहे आणि मला मुंबईला परत न येण्यास सांगितले आहे. आधी मुंबईच्या रस्त्यावर ‘आझादी ग्राफीटी’ आणि त्यानंतर आता मला खुली धमकी, का मुंबई ‘पाकिस्तानव्याप्त काश्मीर’सारखी भासत आहे?’ (हेही वाचा: मुंबई पोलिसांबद्दल 'जजमेंटल' होऊन कुणीही 'पंगा' घेऊ नये; अमेय खोपकर यांचा कंगना रनौत ला मनसे स्टाईल दणका)
कंगना रनौत ट्वीट -
कंगनाच्या रनौतच्या या ट्वीटनंतर महाराष्ट्रातील अनेक राजकारणी लोक, चित्रपट इंडस्ट्रीमधील कलाकार, सामान्य नागरिक यांनी तिच्यावर सडकून टीका केली आहे. आता कंगनाने ती 9 सप्टेंबरला मुंबईमध्ये येत असल्याचे सांगितले आहे. याबाबत केलेल्या ट्वीटमध्ये ती म्हणते, ‘बरेच लोक मला परत मुंबईला न येण्याची धमकी देत आहेत. म्हणूनच मी आता ठरवले आहे की, येत्या आठवड्यात 9 सप्टेंबरला मुंबईला येण्याचा निर्णय घेतला आहे. जेव्हा मी मुंबई विमानतळावर उतरेन तव्हा मी नक्कीच वेळ पोस्ट करेन. कोणाच्या बापाची हिम्मत असेल तर अडवून दाखवा'