सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी चौकशी करता जाण्यास कंगना रनौत ने दिला नकार?
या बातमीवर कंगना रनौतच्या टीमने आपली प्रतिक्रिया देत "मुंबई पोलिसांकडून कंगना रनौत हिला अजूनपर्यंत कोणतेही बोलावणे आले नसून जर असे काही झाल्यास कंगना नक्की सहकार्य करेल" असे म्हटले आहे.
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या आत्महत्येप्रकरणी काही धागेदोरे सापडतात का याचा पोलिस कसून तपास करत आहेत. या प्रकरणी आतापर्यंत अनेकांची चौकशी करण्यात आली. सुशांतच्या मित्र परिवारापासून बॉलिवूडमधील अनेक मंडळीची चौकशी करण्यात आली. यात अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) सोशल मिडियाच्या माध्यमातून सुशांत सिंह राजपूत च्या प्रकणाबाबत काही खुलासे केले होते. यात नेपोटिजमचा उल्लेखही तिने अनेकदा केला आहे. त्यामुळे मुंबई पोलिस कंगना रनौत हिची देखील चौकशी देखील करणार आहे.
या बातमीवर कंगना रनौतच्या टीमने आपली प्रतिक्रिया देत "मुंबई पोलिसांकडून कंगना रनौत हिला अजूनपर्यंत कोणतेही बोलावणे आले नसून जर असे काही झाल्यास कंगना नक्की सहकार्य करेल" असे म्हटले आहे. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी संजय लीला भंसाली यांची चौकशी होणार; मुंबई पोलिसांनी पाठवला समन्स
बॉलिवूडमध्ये घराणेशाही हा वाद आता जोर धरू लागला आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर कंगनाने सोशल मिडियाच्या माध्यमातून बॉलिवूडमधील अनेक खुलासे करत आहेत. यात तिने एका व्हिडिओत "सुशांतची आत्महत्या ही आत्महत्या नसून एक पूर्वनियोजित हत्या आहे" असे म्हटले आहे.