Kangana Ranaut on China: चीनी उत्पादनांवर बहिष्कार अभियानात कंगना रानौतने घेतली उडी, म्हणाली-'चीनविरुद्ध युद्धात सहभाग घेऊन भारताला जिंकवूया'
बॉलीवूड अभिनेत्री कंगना रानौतने एक व्हिडिओ प्रसिद्ध केला असून चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले आहे. कंगनाच्या टीमने अभिनेत्रीचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये कंगना शहीद झालेल्या सैनिकांची आठवण ठेवून चिनी उत्पादनं आणि कंपन्यांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करत आहे.
बॉलीवूड अभिनेत्री कंगना रानौतने (Kangana Ranaut) एक व्हिडिओ प्रसिद्ध केला असून चिनी वस्तूंवर (Chinese Goods) बहिष्कार घालण्याचे आवाहन केले आहे. लडाखमधील (Ladakh) भारत-चीन सीमेवर झालेल्या संघर्षानंतर देशात चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे. लोक चीनला विरोध करण्यासाठी चिनी वस्तूंवर बहिष्कार घालत आहेत. बॉलिवूडचे अनेक तारेही या मोहिमेमध्ये पुढे येत आहेत आणि चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन करीत आहेत. यात आता अभिनेत्री कंगनाने देखील उडी मारली आहे आणि भारत-चीन मुद्द्यावर तिचे मत मांडले आहे. कंगनाच्या टीमने अभिनेत्रीचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये कंगना शहीद झालेल्या सैनिकांची आठवण ठेवून चिनी उत्पादनं आणि कंपन्यांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करत आहे. (India-China Border Tensions: दिल्ली येथील हॉटेल, गेस्टहाऊसमध्ये चीनी नागरिकांना थारा नाही- डीएचआरओए)
व्हिडिओमध्ये कंगना म्हणाली, "जर कोणी आपल्या हातांनी बोटे कापण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या हाताने तळहात कापण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला किती त्रास होईल...तेच कष्ट चीनने आपल्याला लडाखवर त्यांची लालची नजर टाकून दिले आहेत आणि त्या ठिकाणी आपल्या देशाची इंच-इंच सीमा वाचवताना देशाचे 20 जवान शहीद झाले. तुम्ही विसरू शकाल का? त्यांच्या आईचे अश्रू, त्यांच्या विधवांची किंकाळी आणि मुलांनी दिलेले बलीदान? असा विचार करणे योग्य आहे का की सीमेवर जी लढाई होते ती केवळ सैन्याची असते किंवा सरकारची असते? आपलं त्यामध्ये काहीच योगदान नाही?"
View this post on Instagram
"We have to stand together, unite, and collectively fight this war against China!" #अब_चीनी_बंद
A post shared by Kangana Ranaut (@team_kangana_ranaut) on
कंगना पुढे म्हणाली, "आपल्यालाही या युद्धामध्ये भाग घ्यायचा आहे. लडाख हा केवळ जमिनीचा तुकडा नाही तर ही भारताची ओळख आहे. आपणही यात भाग घेऊ नये? आपण चिनी वस्तूवर आणि चीनने गुंतवणूक केलेल्या कोणत्याही कंपन्यांवर बहिष्कार टाकूया. ते आपल्याकडून पैसे कमवतात आणि त्याच्यातून शस्त्रे खरेदी करतात आणि नंतर ते आपल्या सैन्याविरूद्ध वापरतात. तर मग आपण या युद्धात चीनला पाठिंबा देऊ शकतो?" व्हिडिओ शेअर करताना त्यांनी लिहिले, "चीनविरोधात युद्ध लढण्यासाठी आपल्याला एकतेने सामुहिकरित्या उभं राहायला हवे. #अब_चीनी_बंद."
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)