Kangana Ranaut vs BMC: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये बीएमसीला म्हटलं महाराष्ट्र सरकारचा 'पाळीव प्राणी'

यात कंगनाने बीएमसीला राज्य सरकारचा 'पालतू' (पाळीव प्राणी) म्हटले आहे. कंगनाने आपल्या इन्स्टाग्रामवर तिच्या मुंबईतील ऑफिसचं नुकसान केल्याप्रकरणी मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 च्या कलम 351 मध्ये नमूद केलेल्या नियमांचा उल्लेख केला आहे.

कंगना रनौत (Photo Credits: Instagram)

Kangana Ranaut vs BMC: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) ने महाराष्ट्र सरकार आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेला (BMC) एक खास संदेश लिहिला आहे. यात कंगनाने बीएमसीला राज्य सरकारचा 'पालतू' (पाळीव प्राणी) म्हटले आहे. कंगनाने आपल्या इन्स्टाग्रामवर तिच्या मुंबईतील ऑफिसचं नुकसान केल्याप्रकरणी मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 च्या कलम 351 मध्ये नमूद केलेल्या नियमांचा उल्लेख केला आहे.

कंगनाने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'नगरपालिका नियमानुसार अनधिकृत इमारत पाडण्यासाठी संबंधित व्यक्तीला 15 दिवसांचा कालावधी देण्यात येता. मात्र, बीएमसीने इमारत बेकायदेशीरपणे मोडली. त्यामुळे महानगरपालिकेने नियमांचे उल्लघंन केलं आहे. त्यामुळे बीएमसीला या प्रकरणी नुकसान भरपाई द्यावी लागेल, असंही कंगनाने म्हटलं आहे. (हेही वाचा - Anurag Kashyap Accused Of Sexual Exploitation: अनुराग कश्यपने स्वत:वरील लैंगिक शोषणाच्या आरोपावर सोडलं मौन; म्हणाला 'थोडी तरी मर्यादा ठेवा मॅडम')

Kangana Ranaut Instagram Post (Pc- Instagram)

विशेष म्हणजे या पोस्टला कॅप्शन देताना कंगनाने लिहिलं आहे की, 'महाराष्ट्र सरकार आणि त्यांचा पाळीव प्राणी बीएमसीसाठी एक खास संदेश.' बृहन्मुंबई महानगरपालिकेने कंगना रनौत यांच्या याचिकेवर प्रतिज्ञापत्र दाखल केले असून, 2 कोटींची नुकसान भरपाई निराधार असल्याचा दावा केला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif