Kangana Ranaut हिने तिच्या बिकनी फोटोवरुन ट्रोल करणाऱ्यांना दिले असे उत्तर

तसेच वेळोवेळी ती विविध मुद्द्यांवर आपले मत व्यक्त करते. याच पार्श्वभुमीवर बुधवारी कंगना हिने आपला एक बिकनी फोटो सोशल मीडियात पोस्ट केला आहे.

कंगना रनौत (Photo Credits-Twitter)

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kananga Ranaut) ही तिच्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत असते. तसेच वेळोवेळी ती विविध मुद्द्यांवर आपले मत व्यक्त करते. याच पार्श्वभुमीवर बुधवारी कंगना हिने आपला एक बिकनी फोटो सोशल मीडियात पोस्ट केला आहे. यामध्ये कंगना बिकनी घालून समुद्राच्या किनारी बसल्याचे फोटो मधून दिसून येत आहे. मात्र याच फोटोवर आता काही लोकांनी कंगना हिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. यावरुनच कंगना हिने नेहमीप्रमाणेच ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले आहे.(Kangana Ranaut Gets Rape Threats: हत्या आणि बलात्काराच्या धमक्या मिळत असल्याचा कंगना रनौत हिचा खुलासा Watch Video)

कंगना हिने हिंदीत एक ट्विट केले आहे. त्यात तिने असे म्हटले की, काही लोकांनी माझा बिकनी मधील फोटो पाहून धर्म आणि सनातनाबद्दल भाषण देत आहेत. जर मी कधी देवी भैरवी च्या रुपात केस सोडून, वस्रहीन, रक्त पिणारे असे रुप घेऊन समोर आली तर तुमचे काय होईल? स्वत:ला तुम्ही भक्त म्हणवता? धर्मानुसार चाला त्याचे ठेकेदार बनू नका. त्यानंतर कंगना हिने जय श्री राम असे ही लिहिले आहे.(Kangana Ranaut ने शेअर केला Bikini Photo; नेटकऱ्यांनी केले ट्रोल View Tweets)

Tweet:

या फोटोवर काही लोकांनी कमेंट्स ही केल्या होत्या. काहींनी लिहिले की, चित्रपटात आपली भुमिका साकारणाऱ्यांसाठी हे सर्व करणे ठिक आहे. परंतु खासगी अकाउंटवर टाकणे हे योग्य नव्हे. तर एकाने कंगना हिला सपोर्ट करत ट्रोलर्सला उत्तर ही दिले आहे. त्याने असे म्हटले की, कंगना गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या आंदोलनासंबंधित पंजाबी अभिनेता दिलजीत दोसांज यांच्या ट्विटला उत्तर देत असल्याने चर्चेत होती.

दरम्यान, कंगना हिचा आगामी चित्रपट थलायवी ची शूटिंग पूर्ण झाली आहे. या चित्रपटाची कथा जयललिता यांच्या बायोपिकवर आधारित आहे. कंगना या व्यतिरिक्त तेजस आणि धाकड चे सुद्धा शूटिंग करत आहे.