कल्की कोचलिन ने आपल्या मुलीसाठी गायिले आफ्रिकन गाणे, पाहा साफो ची निरागस प्रतिक्रिया, Watch Video

कल्की कोचलिन ही हातात गितार घेऊन एक सुरेल असे आफ्रिकन भाषेतील गाणे गाताना दिसत आहे. यात तिच्या मुली चे निरागस हावभाव पाहून तुमच्याही चेह-यावर हसू उमलल्याशिवाय राहणार नाही

Kalki Koechlin (Photo Credits: Instagram)

कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभर हाहाकार माजविला असून अनेक देशांत लॉकडाऊन ठेवण्यात आला आहे. यामुळे सामान्यांपासून सर्व कलाकार देखील घरात आपल्या कुटूंबियांसोबत वेळ घालवत आहे. देशात हा लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. या दरम्यान बॉलिवूड मध्ये नुकतीच कुमारी माता झालेली कल्की कोचलिन (Kalki Koechlin) सध्या आपल्या मुलीसह छान वेळ घालवताना दिसत आहे. कल्की कोचलिन हिने साफो ला फेब्रुवारीमध्ये जन्म दिला होता. लॉकडाऊन च्या काळात देशभरात असलेली भीषण परिस्थिती पाहता कल्की ने आपल्या मुलीसाठी शांतीचा संदेश देणारे आफ्रिकन गाणे गायिले आहे.

कल्की कोचलिन हिने हातात गितार घेऊन एक सुरेल असे आफ्रिकन भाषेतील गाणे गाताना दिसत आहे. यात तिच्या मुली चे निरागस हावभाव पाहून तुमच्याही चेह-यावर हसू उमलल्याशिवाय राहणार नाही. लॉकडाऊनच्या काळात कल्की कोचलिन आपल्या गोंडस मुलीसह खेळतानाचे सुंदर क्षण कॅमे-यात कैद, नक्की पाहा

 

View this post on Instagram

 

Started learning the uke when I was pregnant to play songs for my baby. It's worked out well, Sappho either gets excited or falls asleep to them. This African lullaby was one of the first songs I learnt from an album called Songs of the Baobab. If anyone knows what the lyrics mean let me know! #mamadiaries #ukulele #sappho #covidtimes

A post shared by Kalki (@kalkikanmani) on

साफो नावाची कवयित्री प्रचंड लोकप्रिय होती. त्यामुळे कल्कीने आपल्या बाळाचं नाव 'साफो' असं ठेवलं आहे. कल्की मागील दोन वर्षांपासून गाय हर्शबर्ग या आपल्या प्रियकरासोबत सोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहते आहे. कल्कीच्या गरोदरपणात तिने अनेकदा आपल्या बेबी बंप सोबत स्टायलिश फोटो शूट केले होते.ग्नाआधीच गरोदर राहिल्यामुळे तिच्यावर अनेक लोकांनी टिका केली होती. मात्र त्या सर्वांना सडेतोड उत्तर देत तिने फेब्रुवारीमध्ये साफोला जन्म दिला.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now