Do Patti Trailer Out: काजोल, क्रिती सेनन आणि शाहीर शेख स्टारर दो पत्ती चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, पहा व्हिडिओ

दो पट्टीमध्ये कृती सेननने दुहेरी भूमिका साकारली आहे. या चित्रपटात ती जुळ्या बहिणींच्या भूमिकेत दिसणार आहे, ज्या एकमेकांच्या कट्टर शत्रू आहेत. ट्रेलरची सुरुवात काजोल आणि शाहीर शेख म्हणजेच ध्रुव सूदच्या सीनने होते. काजोल एक पोलीस अधिकारी म्हणून ध्रुवची चौकशी करते आणि अपघाताबद्दल विचारते.

Do Patti Trailer Out (फोटो सौजन्य - You Tube)

Do Patti Trailer Out: काजोल (Kajol), क्रिती सेनन (Kriti Sanon) आणि शाहीर शेख (Shaheer Sheikh) स्टारर दो पत्ती (Do Patti) या चित्रपटाची प्रतीक्षा अखेर संपली आहे. टीझरपासूनच लोक चित्रपटाच्या ट्रेलरची वाट पाहत होते. अखेर आज या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. शशांक चतुर्वेदी दिग्दर्शित, दो पत्ती हा चित्रपट दोन जुळ्या बहिणींच्या रहस्यावर आधारित आहे, जो त्यांच्या आयुष्यात वेगळे वळण घेतो. या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षकांना आता चित्रपट पाहण्याची उत्सुकता लागली आहे.

दो पत्तीमध्ये कृती सेननने साकारली दुहेरी भूमिका -

दो पट्टीमध्ये कृती सेननने दुहेरी भूमिका साकारली आहे. या चित्रपटात ती जुळ्या बहिणींच्या भूमिकेत दिसणार आहे, ज्या एकमेकांच्या कट्टर शत्रू आहेत. ट्रेलरची सुरुवात काजोल आणि शाहीर शेख म्हणजेच ध्रुव सूदच्या सीनने होते. काजोल एक पोलीस अधिकारी म्हणून ध्रुवची चौकशी करते आणि अपघाताबद्दल विचारते. (हेही वाचा - Kriti Sanon Surprise Visit to Crew Show : 'तुम्हाला मी पायलट बनलेली हवी आहे का?'...क्रू शो ला सरप्राईज भेट देताच फॅन्सच्या रिस्पोंन्सवर क्रिती सॅननची प्रतिक्रीया)

त्यानंतर बॅकस्टोरीमध्ये क्रिती सेनॉन उर्फ ​​सौम्याची कहाणी दाखवली आहे, जी निर्दोष असून ती ध्रुवच्या प्रेमात पडते. ध्रुव आणि सौम्याची प्रेमकहाणी सुरू होते. सौम्याची (क्रिती सॅनॉन) जुळी बहीण ध्रुवला फसवते आणि तिच्या बहिणीचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर कथेत आणखी एक ट्विस्ट येतो. या दोन जुळ्या बहिणी काहीतरी रहस्य लपवत असल्याचं ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलं आहे. या दोघी कोणते गडद रहस्य लपवत आहेत याची कथा काजोल शोधून काढणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर सस्पेन्सने भरलेला आहे. (हेही वाचा :Crew Box Office Collection Day 2: करीना कपूर, तब्बू आणि क्रिती सॅनन स्टारर 'क्रू' ची दुसऱ्या दिवशी चांगली कमाई; कमावले 41.13 कोटी )

दो पत्ती चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, पहा व्हिडिओ  - 

दो पत्ती चित्रपट कधी रिलीज होणार?

दो पत्तीची कथा कनिका धिल्लनं लिहिली आहे. मुख्य भूमिकेसोबतच या चित्रपटातून क्रिती सेनन निर्माती म्हणून तिच्या करिअरची सुरुवात करत आहे. ती दुसऱ्यांदा काजोलसोबत काम करत आहे. त्याचबरोबर ती पहिल्यांदाच शाहीर शेखसोबत रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. हा चित्रपट 25 ऑक्टोबरपासून OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होणार आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now