आज मात्र त्यांच्या निधनाची बातमी आली आणि बॉलिवूडकरांवर शोककळा पसरली. अनेकांनी कादर खान यांच्या जाण्याचे दुःख व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.
बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांनी कादर खान यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून प्रार्थना करण्याचे आपल्या चाहत्यांना आवाहन केले होते. मात्र कादर खान यांच्या निधनानंतर त्यांनी दुःख व्यक्त केले आहे.
तुमच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरुन न निघण्यासारखी असल्याचे अभिनेता अर्जुन कपूर याने म्हटले आहे.
तुम्ही आम्हाला एकत्र हसवलेत आणि रडवलेतही, असे बॉलिवूड दिग्दर्शक मधूर भंडारकर यांनी म्हटले आहे.
अभिनेता मनोज बाजपेयीने देखील कादर खान यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
आम्हाला हसवल्याबद्दल तुमचे आभार, असे ट्विट केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केले आहे.
'दीवाना मैं दीवाना,' 'दूल्हे राजा,' 'अखियों से गोली मारे,' 'दरिया दिल,' 'राजा बाबू,' 'कुली नंबर 1,' 'छोटे सरकार,' 'आंखें,' 'तेरी पायल मेरे गीत,' 'आंटी नंबर 1,' 'हीरो नंबर 1,' 'राजाजी,' 'नसीब' यांसारख्या सिनेमात त्यांनी काम केले होते. आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि जबरदस्त कॉमेडी सेन्सने त्यांनी प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले.