Anjali Arora in New Show: 'कच्चा बदाम' फेम अंजली अरोरा लवकरच 'या' रिअॅलिटी शोमध्ये झळकणार
कचा बदाम गाण्यावर डान्स करून आपली ओळख निर्माण करणाऱ्या अंजली अरोराचे मोठे फॅन फॉलोअर्स आहेत. तिच्या चाहत्यांमुळे अंजली अरोराला लॉक अप सीझन वनमध्ये काम मिळाले.
Anjali Arora in New Show: सोशल मीडिया स्टार अंजली अरोरा (Anjali Arora) तिच्या डान्स मूव्ह्सने लोकांना वेड लावते. कचा बदाम गाण्यावर डान्स करून आपली ओळख निर्माण करणाऱ्या अंजली अरोराचे मोठे फॅन फॉलोअर्स आहेत. तिच्या चाहत्यांमुळे अंजली अरोराला लॉक अप सीझन वनमध्ये काम मिळाले. क्वीन कंगनानेही तिला तिच्या नृत्यकौशल्याबद्दल टोमणा मारला होता. लोक तुला फॉलो का करतात? असा प्रश्न कंगनाने अंजलीला विचारला होता. तरीही अंजली अरोराने लोकांचे मनोरंजन करणे थांबवले नाही. आता लवकरच अंजली धोक्यांसोबत खेळताना दिसणार आहे.
खतरों के खिलाडी सीझन 13 ची घोषणा झाली आहे. हा मोसम आणखीनच प्रेक्षणीय असणार आहे. यामध्ये तुम्हाला 'कच्चा बदाम' फेम अंजली अरोरा प्राणी, पक्षी आणि करंट अशा विविध प्रकारच्या धोक्यांचा सामना करताना पाहायला मिळणार आहे. अंजली अरोरा हिने लॉक अप सीझन 1 मध्येही अतिशय हिंमतीने सर्व कामे पूर्ण केली होती. अशातच आता खतरों के खिलाडीमध्ये धोक्याची पातळी वाढवूनही अंजलीचा उत्साह तसाच राहतो का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. (हेही वाचा -Raveena Tandon Dance With Quick Style Group: नॉर्वेजियन ग्रुपचा रविना टंडनसोबत टीप-टीप बरसा पाणी वर डान्स परफॉर्मन्स (Watch Video))
अंजली अरोराला यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना तिने सांगितलं की, मी या शोमध्ये जाण्यासाठी खूप उत्सुक आहे. मला सरड्यांची खूप भीती वाटते. मात्र, मी या भीतीवर मात करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. सरड्यांशिवाय अंजली अरोराच्या समोर झुरळ आणि सापांचंही आव्हान असणार आहे.
View this post on Instagram
लॉकअप सीझन 1 ला जाण्यापूर्वी अंजली अरोराचे 11 दशलक्ष फॉलोअर्स होते, आता ते 12.5 दशलक्ष झाले आहेत. अशातचं चाहत्यांना अंजलीचे नवे रूप पाहायला मिळणार आहे. खतरों के खिलाडीमध्ये सर्वात मोठ्या खेळाडूचे वास्तव समोर येते. जेव्हा त्यांच्यासमोर विचित्र प्राणी असतात आणि तेव्हा नृत्य करणं विसरतात.
(The above story first appeared on LatestLY on Mar 19, 2023 06:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

