बॉक्स ऑफिसवर ‘कबीर सिंह’ हिट; शाहीद कपूरच्या करियरमधील सर्वात यशस्वी चित्रपट, जाऊन घ्या आतापर्यंतची कमाई

चित्रपट प्रदर्शित झाल्यावर चित्रपटाला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या होत्या. मात्र आता चौथ्या दिवशी चित्रपटाने एकूण 17.54 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

कबीर सिंह (Photo Credits: YouTube)

Kabir Singh box Office Collection: गेल्या कित्येक महिन्यांपासून स्वतःला परत सिद्ध करण्यासाठी शाहीद कपूर (Shahid Kapoor)ला एका हिटची प्रतीक्षा होती. आता त्याचा बहुप्रतीक्षित ‘कबीर सिंह’ सर्वत्र धुमाकूळ घालत असल्याचे दिसत आहे. ‘कबीर सिंह’ हा दक्षिणेतील सुपरहिट चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’ (Arjun Reddy)चा हिंदी रिमेक आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर चित्रपटाला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या होत्या. मात्र आता चौथ्या दिवशी चित्रपटाने एकूण 17.54 कोटी रुपयांची कमाई केली आहे. आतापर्यंत या चित्रपटाने एकूण 88.37 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

अर्जुन रेड्डीमध्ये विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) या अभिनेत्याने भूमिका साकारली होती, आणि त्याचे बरेच कौतुकही झाले होते. मात्र कबीर सिंह पाहून शाहीदही कुठेच कमी पडला नसल्याचे जाणवत आहे. एकूण 3123 स्क्रीन्सवर प्रदर्शित झालेला 'कबीर सिंह' शाहीदच्या करियरमधील हा सर्वात महत्वाचा आणि यशस्वी चित्रपट मानला गेला आहे. अर्जुन रेड्डीचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा (Sandeep Reddy Vanga) यांनीच कबीर सिंहचे दिग्दर्शन केले आहे. (हेही वाचा: शाहिद कपूर च्या 'कबीर सिंह' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कामगिरी, 3 दिवसांत केली इतकी कमाई)

नॉन हॉलिडे प्रदर्शन, ‘अ’ प्रमाणपत्र, तिकीट रेट, चालू असलेला क्रिकेट वर्ल्ड कप, समीक्षकांनी दिलेले खराब रिव्ह्यूज अशा अनेक गोष्टी असूनही,  बॉक्स ऑफिसवर ‘कबीर सिंह’ने चांगले यश कमावले आहे. लवकरच हा चित्रपट ‘उरी’ला टक्कर देईल असे बोलले जात आहे.