शाहिद कपूर च्या 'कबीर सिंह' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कामगिरी, 3 दिवसांत केली इतकी कमाई

शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि कियारा आडवाणी (Kiara Advani) यांची प्रमुख भूमिका असलेला 'कबीर सिंह' या चित्रपटाने आतापर्यंत 70.83 कोटींची कमाई केली आहे.

Kabir Singh Scene (Photo Credits: YouTube)

नुकताच प्रदर्शित झालेला 'कबीर सिंह' (Kabir Singh) हा चित्रपट सध्या बॉक्सऑफिसरवर धुमाकूळ घालतोय. चित्रपटातील गाणी आणि चित्रपटाची कथा प्रेक्षक खूपच पसंत करत आहेत. शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि कियारा आडवाणी (Kiara Advani) या चित्रपटात मुख्य भूमिकेत असून त्यांचे कामही प्रेक्षकांना आवडत आहे. उत्कृष्ट कथा आणि उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर कबीर सिंह ने आतापर्यंत 70.83 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाच्या गाण्यांमुळे आणि ट्रेलरमुळे या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेज होती.

या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 20.21 कोटी ची कमाई केली होती. त्यानंतर शनिवारी 22.71 करोड आणि रविवारी जवळपास 27.91 कोटी इतकी कमाई केली. असे करता करता आतापर्यंत या चित्रपटाने जवळपास 70.83 कोटींची कमाई केली आहे.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा चित्रपट शाहिदच्या करिअर क्षेत्रातील आतापर्यंत सर्वात मोठा सोलो हिट चित्रपट आहे. 'कबीर सिंह' आतापर्यंत 3123 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाली आहे. आता पाहायचय की वीकडेज ला हा चित्रपट कसे प्रदर्शन करतो.

हेही वाचा- Kabir Singh Song 'Kaise Hua': तुमच्या पहिल्या प्रेमाची आठवण करुन देणारं शाहिद कपूर आणि कियारा आडवाणी चे एक सुंदर असं रोमँटिक गाणं प्रदर्शित

शाहिद कपूर आणि कियारा आडवाणी ची केमिस्ट्री प्रेक्षक खूप पसंत करत आहेत. शाहिद कपूर या चित्रपटात एक असा व्यक्ती दाखवला आहे ज्याला स्वत:च्या रागावर नियंत्रण ठेवता येत नाही. सुरुवातीला त्याच्या भूमिकेविषयी प्रेक्षकांचा थोडा संभ्रम होईल. मात्र चित्रपटाच्या शेवटपर्यंत तुम्हाला शाहिदची भूमिका खिळवून ठेवेल.