John Abraham Nude Photo: जॉन अब्राहम ने सोशल मीडिया वर दाखवला आपला सर्वात हॉट अंदाज; शेअर केला न्यूड फोटो
जॉन अब्राहम (Photo Credits: Instagram)

John Abraham Nude Photo: बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) सध्या त्याच्या आगामी ‘एक व्हिलन द रिटर्न्स’ (Ek Villain Returns) चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यक्त आहे. यावेळी अभिनेताने आपल्या इंस्टाग्रामवर त्याचा एक फोटो शेअर केला. हा फोटो पोस्ट केल्यानंतर प्रचंड व्हायरल झाला आहे. अभिनेत्याने हा फोटो काही तासांपूर्वी शेअर केला होता आणि अल्पावधीत त्याला 5 लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

या फोटोमध्ये जॉन न्यूड दिसत आहे. त्याने उशीने स्वत: ला लपेटले आहे. सोफ्यावर बसलेला जॉन कॅमेर्‍याकडे पाहून हसताना दिसत आहे. अभिनेत्याने इंस्टाग्रामवर स्वत: चा नग्न फोटो शेअर केला आहे. जॉन अब्राहमने हा फोटो शेअर करताना लिहिलं आहे की, मी कपडे येण्याची प्रतीक्षा करीत आहे. हा फोटो पाहिल्यानंतर चाहतेदेखील टिप्पणी करण्यापासून स्वत: ला रोखू शकलेले नाहीत. एका यूजर्संनी हा फोटो हॉट असल्याचं म्हटलं आहे तर, दुसऱ्या यूजर्संनी फोटो क्लिक केलेल्या व्यक्तीबद्दल विचारलं आहे. (वाचा - Tiger Shroff Birthday: Disha Patani आणि Tiger Shroff च्या लग्नावर जॅकी श्रॉफने सोडलं मौन; केलं 'हे' महत्त्वाचं वक्तव्य)

 

View this post on Instagram

 

A post shared by John Abraham (@thejohnabraham)

जॉन अब्राहमचा नवीन चित्रपट मुंबई सागाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. ज्याला लोकांची खूप पसंती मिळाली. हा चित्रपट 19 मार्च 2021 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात इमरान हाश्मी एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.