‘Jigra’ Teaser Trailer: वासन बाला दिग्दर्शित, आलिया भट्ट आणि वेदांग रैना स्टारर 'जिगरा' चा भावनिक टीझर ट्रेलर प्रदर्शित (Watch Video)
आलिया भट्ट आणि वेदांग रैना स्टारर 'जिगरा' चा टीझर ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. व्हायकॉम18 स्टुडिओ निर्मिती, धर्मा प्रॉडक्शन आणि इटरनल सनशाइन प्रॉडक्शनच्या बॅनरखाली चित्रपटाची निर्मिती झाली आहे.
‘Jigra’ Teaser Trailer: आलिया भट्ट आणि वेदांग रैना वासन बाला यांच्या आगामी चित्रपट जिगरामध्ये मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटात बहिण भावाच्या अतूट प्रेमाचे नाते दाखवले आहे. आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि वेदांग रैना चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. आपल्या लहान भावाला म्हणजेच वेदांग रैना (Vedang Raina) याला कोणत्याही किंमतीवर वाचवण्यासाठी बहिण आलीयाची धडपड ही या चित्रपटाच्या टीझर ट्रेलरमधून (Jigra Teaser Trailer)दाखवली आहे. टीझर ट्रेलरमध्ये "फूलों का तारो का" हे उत्तेजक गाणे दाखवण्यात आले आहे. (हेही वाचा:Devara Trailer Update: 10 सप्टेंबरला रिलीज होणार 'देवरा'चा ट्रेलर, नवीन पोस्टर शेअर करून निर्मात्यांनी दिली माहिती (View Poster))
'जिगरा' चा भावनिक टीझर ट्रेलर
आलिया भट तिच्या अत्यंत दुखद बालपण आणि तुरुंगात असलेल्या तिच्या भावाची सुटका करण्याच्या ध्येयावर असते हे टीझर ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे. आलिया भावाच्या सुटकेसाठी व्हिडीओ क्लिपमध्ये अत्यंत कठिण परिस्थीतीचा सामना करताना दिसते. 11 ऑक्टोबर रोजी चित्रपट प्रदर्शित होत आहे. सुरुवातीला 27 सप्टेंबर रोजी चित्रपट रिलीज होणार होता. मात्र, 11 ऑक्टोबर रोजी चित्रपट शेड्यूल करण्यात आला आहे.
(The above story first appeared on LatestLY on Sep 08, 2024 12:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

