Mili Trailer Out: मायनस डिग्री तापमानात जीवनाची लढाई लढताना दिसली जान्हवी कपूर; अभिनेत्रीच्या 'मिली' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, Watch Video

जीवन आणि मृत्यूशी झुंज देत असलेल्या जान्हवी कपूरची ही स्टाईल पाहून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके आणखीनच वेगवान झाले आहेत.

Mili Trailer Out (PC - You Tube)

Mili Trailer Out: यापूर्वी प्रदर्शित झालेल्या अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) च्या 'मिली' (Mili) या चित्रपटाच्या टीझरने सर्वांनाच वेड लावले होते. चित्रपटाचा टीझर पाहिल्यानंतर आता या चित्रपटाचा ट्रेलरही रिलीज करण्यात आला आहे. नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपटाचा ट्रेलर पाहून सर्वांच्या अंगावर शहारे उमटले आहेत. जीवन आणि मृत्यूशी झुंज देत असलेल्या जान्हवी कपूरची ही स्टाईल पाहून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके आणखीनच वेगवान झाले आहेत.

बोनी कपूर निर्मित या चित्रपटात अभिनेत्री जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. समोर आलेल्या ट्रेलरमध्ये अभिनेत्री मायनस डिग्री तापमानात मृत्यूशी झुंज देताना दिसत आहे. ट्रेलरची सुरुवातीला मिली फ्रीझरमध्ये बंद झाल्याच पाहायला मिळतं. त्यानंतर मिली स्वत:ला वाचवण्यासाठी धडपडत आहे. चित्रपटाच्या कथेबद्दल सांगायचे तर, जान्हवी या चित्रपटात मिली नौडियालची भूमिका साकारत आहे, जी तिच्या वडिलांसोबत एकटीच राहते. (हेही वाचा - Jitendra Shastri Passed Away: चित्रपटसृष्टीतून पुन्हा एकदा वाईट बातमी; ‘ब्लॅक फ्रायडे’ फेम अभिनेता जितेंद्र शास्त्रीचे निधन)

परदेशी नोकरीसाठी आलेली ऑफर स्वीकारून ती मिळवण्यासाठी ती पूर्ण तयारी करते. पण मग एके दिवशी कथेत अचानक ट्विस्ट येतो. 'मिली' तिच्या कामाच्या ठिकाणी मायनस डिग्री तापमानाच्या फ्रीझरमध्ये बंद होते. अचानक बेपत्ता झालेल्या मिलीचा शोध घेण्यासाठी पोलिसांपासून कुटुंबीयांपर्यंत सर्वच जण शर्थीचे प्रयत्न करताना दिसत आहेत. मिलीचे पुढे काय होते हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला चित्रपट रिलीज होण्याची वाट पाहावी लागेल.

पुढील महिन्याच्या 4 तारखेला हा चित्रपट चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. या चित्रपटात जान्हवीशिवाय मनोज पाहवा आणि सनी कौशल देखील दिसणार आहेत. जान्हवी कपूरचा "मिली" हा मल्याळम थ्रिलर चित्रपट हेलनचा रिमेक आहे, ज्याचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते मथुकुट्टी झेवियर यांनी केले आहे. मथुकुट्टी झेवियर यांनी बोनी कपूर प्रॉडक्शन अंतर्गत निर्मित मिलीचे दिग्दर्शनही केले आहे.