Sridevi Death Anniversary: श्रीदेवी यांच्या पहिल्या स्मृतीदिना निमित्त 'जान्हवी कपूर'ची भावनिक पोस्ट!
बॉलिवूडची सुपरहिट दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचा आज पहिला स्मृतीदिन. पहिल्या स्मृतीदिनानिमित्त श्रीदेवी यांची मुलगी आणि अभिनेत्री जान्हवी कपूर हीने एक भावूक पोस्ट केली आहे.
Sridevi Death Anniversary: बॉलिवूडची सुपरहिट दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) यांचा आज पहिला स्मृतीदिन. पहिल्या स्मृतीदिनानिमित्त श्रीदेवी यांची मुलगी आणि अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) हीने एक भावूक पोस्ट केली आहे. सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करत जान्हवीने आईच्या आठवणींना उजाळा दिला आहे. Sridevi Death Anniversary निमित्त बोनी कपूर करणार श्रीदेवी यांच्या साड्यांचा लिलाव; मिळालेल्या रक्कमेतून करणार 'हे' काम
जान्हवीने इंस्टाग्रामवर लिहिले की, "माझं हृदय नेहमीच भरलेलं राहील. पण मी नेहमी हसत राहीन कारण त्यात तू आहेस."
View this post on Instagram
My heart will always be heavy. But I’ll always be smiling because it has you in it.
यापूर्वी श्रीदेवीच्या निधनावर जान्हवीने एक खास पोस्ट लिहून आपले दुःख व्यक्त केले आहे.
24 फेब्रुवारी, 2018 ला श्रीदेवी यांचे दुबईत निधन झाले. भाचा मोहित मारवाह यांच्या विवाहसोहळ्यासाठी त्या दुबईत गेल्या होत्या. या आनंदी सोहळ्यात बाथटबमध्ये बुडून श्रीदेवी यांचा आकस्मित मृत्यू झाला.
श्रीदेवी यांच्या निधनानंतर बॉलिवूडकरांवर एकच शोककळा पसरली. त्यांना श्रद्धाजंली वाहण्यासाठी बॉलिवूड स्टार्ससह अनेक दिग्गजांनी गर्दी केली होती.
(The above story first appeared on LatestLY on Feb 24, 2019 10:18 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

