Janhvi Kapoor Discharged: जान्हवी कपूरला रुग्णालयातून डिस्चार्ज; अन्नातून झाली होती विषबाधा

ती घरी परतली आहे. वृत्तानुसार, तिचे वडील बोनी कपूर ( Boney Kapoor) यांनी या बातमीला दुजोरा दिला आणि सांगितले की, 'आज सकाळी तिला डिस्चार्ज देण्यात आला. आता ती बरीच बरी आहे.'

Janhvi Kapoor (PC- Instagram)

Janhvi Kapoor Discharged: बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) ला अन्नातून विषबाधा झाल्याने (Food Poisoning) रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 18 जुलै रोजी अभिनेत्रीला दक्षिण मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता तिच्या प्रकृतीशी संबंधित एक मोठे अपडेट समोर येत आहे. अभिनेत्रीला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. ती घरी परतली आहे.

जान्हवी हॉस्पिटलमधून घरी परतली -

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री जान्हवी कपूरला शनिवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. ती घरी परतली आहे. वृत्तानुसार, तिचे वडील बोनी कपूर (Boney Kapoor) यांनी या बातमीला दुजोरा दिला आणि सांगितले की, 'आज सकाळी तिला डिस्चार्ज देण्यात आला. आता ती बरीच बरी आहे.' बुधवारी जान्हवीला अशक्तपणा जाणवत होता, त्यानंतर तिला दुसऱ्या दिवशी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. (हेही वाचा -Rajkummar Rao ने Janhvi Kapoor च्या ड्रेसवरून केली चेष्टा पुढे जे झाले ते पाहून बसेल धक्का, पाहा व्हिडीओ)

रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी, अभिनेत्री 15 जुलै रोजी तिच्या आगामी 'उलझ' चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान दिसली होती. यावेळी तिने माध्यमांशी संवादही साधला. तिच्या ब्लॅक अँड व्हाइट आउटफिटमध्ये ती खूपच आकर्षक दिसत होती. तथापी, गेल्या आठवड्यात ती अनंत आणि राधिकाच्या लग्नात दिसली होती. या लग्नात ती तिच्या लूकमुळे चर्चेत राहिली. (हेही वाचा -Janhvi Kapoor हिचा समुद्र किनाऱ्याजवळील बिकिनी मधला Sexy व्हिडिओ नक्की पहाच)

जान्हवी कपूरच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, 'उलझ' व्यतिरिक्त तिच्याकडे आणखी काही प्रोजेक्ट्स आहेत. ती वरुण धवनसोबत 'सनी संस्कार की तुलसी कुमारी'मध्ये दिसणार आहे. याशिवाय, ती 'देवरा: पार्ट 1' या ॲक्शन फिल्ममधून तेलुगुमध्ये पदार्पण करणार आहे. ज्यामध्ये एनटीआर ज्युनियर, सैफ अली खान, श्रुती मराठे, प्रकाश राज आणि श्रीकांत यांचा समावेश आहे.