Money Laundering Case: जॅकलिन फर्नांडिसच्या जामिनावरील निर्णय पुढे ढकलला; मंगळवारी होणार सुनावणी
सुनावणीनंतर शुक्रवारी निकाल सुनावण्यात येईल, असे न्यायालयाने त्या दिवशी सांगितले होते.
Money Laundering Case: बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) सध्या तिच्या कामापेक्षा सुकेश चंद्रशेखरसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांची दीर्घकाळ चौकशी सुरू आहे. अभिनेत्री सध्या अंतरिम जामिनावर बाहेर असली तरी आजचा दिवस म्हणजे 11 नोव्हेंबर हा दिवस तिच्यासाठी खूप महत्त्वाचा होता. आज तिच्या जामिनावर आज कुठे निर्णय होणार होता. मात्र, आता तो 15 तारखेला येणार असल्याचे समोर आले आहे. आता 15 नोव्हेंबर रोजी, महाठग आणि जॅकलिनचा कथित प्रियकर सुकेश चंद्रशेखर यांच्याशी संबंधित या 200 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात, दिल्लीचे पटियाला कोर्ट अभिनेत्रीला तुरुंगात टाकायचे की, जामीन द्यायचा यावर निर्णय देणार आहे.
गुरुवारी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर जॅकलिन फर्नांडिसच्या जामीन अर्जावर निर्णय राखून ठेवण्यात आला होता. सुनावणीनंतर शुक्रवारी निकाल सुनावण्यात येईल, असे न्यायालयाने त्या दिवशी सांगितले होते. अशा स्थितीत आता 15 तारखेला राखीव आदेश जाहीर होणार आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने स्वतःच्या ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली आहे. अशा परिस्थितीत 15 तारखेला जॅकलिनचा जामीन अर्ज फेटाळला तर अभिनेत्रीला तुरुंगाची हवा खावी लागू शकते. (हेही वाचा -Siddhaanth Vir Surryavanshi Passed Away: टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता सिद्धान्त वीर सुर्यवंशी याच निधन; जिममध्ये वर्कआऊट करताना पडला बेशुद्ध)
गुरुवारी झालेल्या सुनावणीदरम्यान अंमलबजावणी संचालनालयाने पतियाळा हाऊस कोर्टात अभिनेत्रीला जामीन देण्यास विरोध केला होता. मनी लाँड्रिंगशी संबंधित सर्व आरोपींना कारागृहात पाठवण्यात आले असताना जॅकलिनला जामीन का द्यावा, असा युक्तिवाद त्यांनी न्यायालयात केला. यासोबत त्यांनी जॅकलिनच्या जामीन अर्जाला आपला विरोध व्यक्त करताना म्हटले की, अभिनेत्रीने देशातून पळून जाण्याचा प्रयत्न केला आहे. एवढेच नाही तर या प्रकरणाच्या तपासातही सहकार्य केले नाही. अशा स्थितीत जॅकलिनला जामीन मिळू नये.
दरम्यान, जॅकलिनवर मनी लाँड्रिंग प्रकरणात पुराव्यांशी छेडछाड केल्याचाही आरोप आहे. यासोबतच या अभिनेत्रीवर सुकेश चंद्रशेखरकडून करोडोंच्या भेटवस्तू घेतल्या. सत्य माहीत असूनही त्याच्याशी संबंध ठेवल्याचा आरोप आहे. आता न्यायालय काय निर्णय देते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. सध्या या प्रकरणी अभिनेत्रीला अंतरिम जामीन मिळाला आहे.