Alia's bestie Akansha Ranjan dating KL Rahul? (Photo Credits: Instagram)

उद्यापासून (30 मे) वर्ल्ड कपची धूम सुरु होईल. भारतासह सर्व क्रिकेट टीम्स वर्ल्डकपसाठी सज्ज झाल्या आहेत. मात्र सध्या चर्चा रंगतेय ती भारतीय क्रिकेट संघातील स्टार खेळाडू के. एल. राहुलची (K.L. Rahul). बांगलादेश विरुद्धच्या सराव सामन्यात शतकी खेळी करत त्याने संघातील चौथे स्थान पक्के केले. मात्र चर्चा रंगतेय ती त्याच्या खेळामुळे नाही तर सोशल मीडियावरील या फोटोजमुळे.

के. एल. राहुल सध्या आलिया भट हिची बेस्ट फ्रेंड आकांक्षा रंजन कपूर हिला डेट करत असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियात रंगत आहे. काही दिवसांपूर्वी आकांक्षानं राहुलसोबत इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. त्यानंतर चर्चांना उधाण आले आहे.

आकांक्षा कपूर हिची पोस्ट:

आकांक्षा मॉडेल असून तिनं नुकतेच अभिनेता अपरीक्षित खुराना सोबत एका गाण्यातून अभिनय क्षेत्रात पर्दापण केले आहे. आकांक्षा पूर्वी राहुलचे नाव अभिनेत्री निधी अग्रवाल हिच्यासोबत जोडण्यात आले होते. तर अविक चॅटर्जी या व्यावसायिकासोबत आकांक्षा रिलेशनशीपमध्ये असल्याचे बोलले जात होते.

आलिया-आकांक्षा यांचे फोटोज:

आकांक्षा आणि आलिया या बालमैत्रिणी असून त्या एकमेकींसोबतचे फोटोज अनेकदा सोशल मीडियावर शेअर करत असतात. इतकंच नाही तर सुनील शेट्टीची मुलगी अथिरा शेट्टी आणि आकांक्षा कपूर या दोघी देखील चांगल्या मैत्रिणी आहेत.