Amitabh Bachchan यांच्यासोबत काम करण्याची Irrfan Khan चा मुलगा Babil Khan ची इच्छा; फोटोसह शेअर केली भावूक पोस्ट

इरफान खानचा अभिनय, त्याची खास शैली या सगळ्यालाच आता आपण मुकणार आहोत. परंतु, त्याचा अभिनयाचा वारसा मुलगा बाबिल खान पुढे चालवणार आहे.

Babil Khan & Amitabh Bachchan (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेता इरफान खान (Irrfan Khan) याची एक्झिट मनला चटका लावणारी होती. इरफान खानचा अभिनय, त्याची खास शैली या सगळ्यालाच आता आपण मुकणार आहोत. परंतु, त्याचा अभिनयाचा वारसा मुलगा बाबिल खान (Babil Khan) पुढे चालवणार आहे. बाबिलला देखील वडीलांप्रमाणे महान अभिनेता व्हायचे असून त्यासाठी प्रचंड मेहनत घेण्याची त्याची तयारी आहे. अलिकडेच बाबिलने सोशल मीडियावर आपल्या वडीलांचा आणि अमिताभ बच्चन यांचा फोटो शेअर करत भावूक पोस्ट केली आहे. या फोटोत इरफान आणि बिग बी एकमेकांची गळाभेट घेत आहेत.

बाबिलने हा फोटो शेअर करत अमिताभ बच्चन सोबत काम करण्याचे माझे स्वप्न असल्याचे म्हटले आहे. बाबिल पोस्टमध्ये लिहितो, "मी अगदी सहज दु:खी होतो आणि त्यानंतर मी नखरे दाखवायला लागतो. त्यानंतर मला जाणवू लागते की, बाबाचे चाहते प्रेमळ आहेत. त्यानंतर मी द्वेषाकडे दुर्लक्ष करतो. एक दिवस मी माझ्या कठोर मेहनतीने आणि संयमाने पात्र बनेन. तेव्हा मी माझ्या बाबांच्या चाहत्यांना proud फिल करवेन." (दिवंगत Irrfan Khan ला Filmfare Awards 2021 मध्ये Ayushmann Khurrana द्वारा कवितेतून इमोशन ट्रिब्युट; Babil Khan च्या अश्रूंचा फुटला बांध, Watch Video)

पहा पोस्ट:

 

View this post on Instagram

 

A post shared by Babil (@babil.i.k)

बाबिल लवकरच लैला मजनू स्टार तृप्ती डिमरी सोबत Qala या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पर्दापण करेल. या सिनेमाची निर्मिती अनुष्का शर्मा करत असून नेटफ्लिक्स च्या माध्यमातून हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif