'Ready For the Lockdown' म्हणत Ira Khan ने बॉयफ्रेंड Nupur Shikhare सोबत शेअर केला रोमांटिक फोटो
Ira khan & Nupur Shikhare (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड स्टार आमिर खान (Aamir Khan) ची मुलगी इरा खान (Ira khan) सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते. अनेक गोष्टींमुळे इरा खान चर्चेत असते. अलिकडेच तिने बॉयफ्रेंड नुपुर शिखरे (Nupur Shikhare) सोबत फोटो शेअर करत त्यांच्या रिलेशनशीपबद्दल खुलासा केला होता. त्यानंतर इरा-नुपुरच्या डेटिंगच्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा असतात. अलिकडेच इराने बॉयफ्रेंड नुपुर शिखरे सोबतचा रोमांटिक फोटो शेअर केला होता. त्यानंतर तो प्रचंड व्हायरल होत आहे.

इराने नुपुरसोबतचा ब्लॅक अँड व्हाईट कॅनडिड फोटो इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला होता. हा फोटो शेअर करत तिने लॉकलाऊनसाठी तयार असल्याचे म्हटले होते. तसंच फोटोत हार्ट इमोजी देखील वापरला होता. (Aamir Khan च्या मुलीचे नाव इरा नसून 'हे' आहे खरे नाव, चुकीचे नाव उच्चारल्यास 5000 रुपयांचा दंड भरावा लागणार असल्याची व्हिडिओद्वारे दिली माहिती)

Ira khan Instagram Story (Photo Credits: Instagram)

यावर्षी व्हॅलेटाईन डे ला इराने नुपूर सोबतच्या आपल्या नात्याचा खुलासा केला होता. नुपूर सोबतचे फोटोज शेअर करत तिने चाहत्यांना आपल्या रिलेशनशिपबद्दल सांगितले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ira Khan (@khan.ira)

यापूर्वी इराने सोशल मीडियावर तिच्या डिप्रेशनबद्दल खुलेपणाने सांगितले होते. मानसिक आरोग्याबद्दलचा एक व्हिडिओ देखील तिने शेअर केला होता. तसंच ती अनेकदा विविध मुद्द्यांवर मोकळेपणाने भाष्य करणारी इरा आपल्या ट्रोलर्संना देखील सडेतोड उत्तरं देते.