International Yoga Day 2019: बॉलिवूडच्या या '5' हॉट अभिनेत्री फिटनेससाठी करतात योगा; पहा व्हिडिओज
दरवर्षी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योगा दिवस 2019 (International Yoga Day 2019) साजरा केला जातो. लोकांमध्ये आरोग्य, फिटनेस याबद्दल जागृकता निर्माण करणे आणि योगाचे महत्त्व पटवून देणे हा योग दिन साजरा करण्यामागील प्रमुख उद्देश आहे.
दरवर्षी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योगा दिवस 2019 (International Yoga Day 2019) साजरा केला जातो. लोकांमध्ये आरोग्य, फिटनेस याबद्दल जागृकता निर्माण करणे आणि योगाचे महत्त्व पटवून देणे हा योग दिन साजरा करण्यामागील प्रमुख उद्देश आहे. बॉलिवूडच्या हॉट अभिनेत्री देखील फिटनेससाठी योगसाधनेचा आधार घेतात. (यंदाचा जागतिक योगदिन 'Yoga For Heart' थीमवर; रांची मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साजरा करणार योगा डे!)
या हॉट अभिनेत्रींचा फिटनेस आणि हॉटनेस पाहून तुम्हालाही योगसाधनेचे महत्त्व पटेल. यंदाच्या जागतिक योग दिनानिमित्त जाणून घेऊया योगसाधना करणाऱ्या बॉलिवूडच्या हॉट अभिनेत्रींबद्दल...
मलायका अरोड़ा (Maliaka Arora)
मलायका हिच्या स्लिम ट्रिम फिगरचे अनेक चाहते आहेत. मलायका तिच्या हॉटनेसमुळे सोशल मीडियात कायम चर्चेत असते. जिममध्ये वर्कआऊट सोबतच मलायका योगसाधना देखील करते.
शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty)
शिल्पा शेट्टी आणि योगाचे नाते तसे सर्वश्रूत आहे. आपल्या फिटनेस विषयी शिल्पा प्रचंड जागृक असून सोशल मीडियावरही तिच्या योगा प्रेमाची प्रचिती येत असते.
दिशा पटानी (Disha Patani)
हॉट फिगर आणि फिटनेसमुळे दिशा पटानी कायम चर्चेत असते. वर्कआऊट आणि योगा याचा परिणाम काय असतो, हे तिला पाहिल्यावर कळते.
करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan)
View this post on Instagram
वाढत्या वयासोबत करीनाचे व्यक्तिमत्त्व अधिक खुलत आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. स्टाईल आयकॉन असणाऱ्या करीनाच्या फिटनेसचे रहस्य आहे जिम वर्कआऊट आणि योगासनं.
अदा शर्मा (Adah Sharma)
सोशल मीडियावर आपल्या फोटोज आणि व्हिडिओज मुळे अदा शर्मा कायम चर्चेत असते. ती अनेकदा हॉट स्टाईल वर्कआऊट आणि अगदी सहज योगासनं करताना दिसते.
(The above story first appeared on LatestLY on Jun 20, 2019 03:44 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

