महेश भट्ट यांच्या हत्येचा कट रचरणारा Abdul Rashid Radiowala अमेरिकेकडून भारताच्या हवाली
या आरोपाखाली न्यूजर्सी येथील इस्लिन येथील Enforcement and Removal Campaign ने सप्टेंबर 2017 मध्ये रेडियोवाला याला अटक केली होती. दरम्यान, त्याच्यावर न्यायालयात सुनावणी सुरु असताना त्याला भारताकडे सुपूर्त करण्यात यावे, असे आदेश न्यायाधिशांनी दिले होते.
हत्या, हत्येचा कट, खंडणी, चोरी आणि अवैध मार्गाने शस्त्र बाळगणे अशा अनेक गुन्ह्यांसाठी भारतला हवा असलेला मोस्ट वॉन्टेड भारतीय नागरिक उबेदुल्ला अब्दुलरशीद रेडियोवाला (वय 46 वर्षे) याला अमेरिकेने भारताच्या हवाली केले आहे. उबेदुल्ला अब्दुलरशीद रेडियोवाला (Abdul Rashid Radiowala) याच्यावर चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक महेश भट्ट (Mahesh Bhatt) यांच्या हत्येचा कट रचल्याचाही आरोप आहे. रेडियोवाला याला अमेरिकेने भारताच्या ताब्यात दिल्याने त्याच्याकडून अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे.
रेडियोवाला याच्यावर मकोका
उबेदुल्ला अब्दुलरशीद रेडियोवाला याच्यावर संघटीत गुन्हेगारी विरोधी कायदा (मकोका) अंतर्गत अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरोधात अजनामिनपात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर सीबीआयच्या सूचनेनुसार इंटरपोलने रेडियोवाला याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस 2015 मध्ये जारी केली होती. रेडियोवाला याने 2014 मध्ये बॉलिवूड दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या हत्येचा कट रचला. तसेच, बॉलिवूड चित्रपट विश्वातील नामांकीत करीन मोरानी यांच्यावर गोळ्या झाडल्याचा मुख्य आरोप आहे.
विविध गुन्ह्यांच्या आरोपाखाली सीबीआय रेडियोवाला याच्या मागावर
अमेरिकी Immigration and Customs Enforcement (आयसीई) द्वारा प्राप्त माहितीच्या आधारे प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, हत्या, हत्येचा कट, खंडणी, चोरी आणि अवैध मार्गाने शस्त्र बाळगणे तसेच गुन्हे आणि गुन्हेगारांशी संपर्क साधण्यासाठी इंटरनेटचा वापर केल्याच्या आरोपाखाली रेडियोवाला हा भारताला हवा होता. (हेही वाचा, महेश भट्टकडून कन्या आलियाला बर्थडे गिफ्ट, सडक-२ मधून दिग्दर्शनात घरवापसी)
अवैध मार्गाने राहात असल्याबद्दल अमेरिकेत अटक
दरम्यान, रेडियोवाला याच्यावर अमेरिका या देशात अवैधरित्या राहण्याचा आरोप आहे. या आरोपाखाली न्यूजर्सी येथील इस्लिन येथील Enforcement and Removal Campaign ने सप्टेंबर 2017 मध्ये रेडियोवाला याला अटक केली होती. दरम्यान, त्याच्यावर न्यायालयात सुनावणी सुरु असताना त्याला भारताकडे सुपूर्त करण्यात यावे, असे आदेश न्यायाधिशांनी दिले होते. त्याला सोमवारी भारताच्या हवाली करण्यात आले. मात्र, तोपर्यंत तो ERO नेवार्क यांच्या ताब्यात होता.