आयुष्यातील 78 वर्षात शिकता आले नाही, ते लॉकडाउनमध्ये शिकलो; अमिताभ बच्चन यांची भावनिक पोस्ट
यामुळे अचानक सारे काही ठप्प झाले आहे. या लॉकडाउनमुळे प्रत्येकाच्या जगण्यावर परिणाम झाला आहे. अद्यापही लॉकडाऊनची स्थिती कायम आहे.
कोरोनाच्या संकटाशी मुकाबला करण्यासाठी लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. यामुळे अचानक सारे काही ठप्प झाले आहे. या लॉकडाउनमुळे प्रत्येकाच्या जगण्यावर परिणाम झाला आहे. अद्यापही लॉकडाऊनची स्थिती कायम आहे. या कठीण काळात कलाकार मोठ्या प्रमाणावर व्यक्त झाले आहेत. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) नेहमी सोशल मीडियावरील पोस्टमुळे नेहमी चर्चेत असतात. अमिताभ बच्चन हे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला अनुभव शेअर करत असतात. नुकतीच अमिताभ बच्चन यांनी एक पोस्ट केली आहे. ज्यात ते भावूक झाल्याचे दिसत आहे. आपल्या आयुष्यातील 78 वर्षात जे काही शिकता, समजता आणि अनुभवता आले नाही, ते लॉकडाउनच्या काळात शिकलो, अशी पोस्ट त्यांनी केली आहे. यामुळे त्यांच्या चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाली आहेत.
अमिताभ बच्चन हे नेहमी त्यांच्या ट्विटर हॅंडलवरून आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असतात. दरम्यान, ते कधी मजेदार तर, गंभीर पोस्ट करत असतात. आज नुकतीच त्यांनी एक पोस्ट केली आहे. ज्यात ते म्हणाले आहेत की, या लॉकडाउनच्या काळात मी जे काही शिकलो आहे, ते माझ्या आयुष्यातील 78 वर्षात मला शिकता आले नाही. तसेच मी जे काही व्यक्त करत आहे. हा याचाच एक भाग आहे. हे देखील वाचा- Fake Casting Alert: 'फिलहाल 2' गाण्याच्या कास्टिंगसाठी येणारे कॉल्स फेक; अक्षय कुमार याने ट्विट करत केला खुलासा
अमिताभ बच्चन यांचे ट्वीट-
सध्या भारतावर कोरोना विषाणूचे संकट वावरत आहे. याच पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाउन घोषीत करण्यात आला आहे. दरम्यान, सोशल मीडियाच्या वापरकर्त्यांमध्येही मोठी वाढ झाली आहे. प्रत्येकजण आपला अनुभव सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करत आहेत. सर्वसामान्यांसह राजकीय नेते, खेळाडू आणि बॉलिवूड कलाकारांचाही यात समावेश आहे.