Vicky Kaushal On Katrina Kaif Pregnancy Rumours: कतरिना कैफच्या प्रेग्नेंसीच्या अफवांवर पहिल्यांदा बोलला पती विकी कौशल, म्हणाला, 'आम्ही तुम्हाला गुड न्यूज सांगू..'

पत्नी कतरिना कैफच्या प्रेग्नेंसीच्या अफवांवर विकी कौशल बोलला आहे. नुकतेच एका कार्यक्रमात त्याने सांगितले की, या वृत्तांमध्ये काहीही तथ्य नाही, पण वेळ आल्यावर मी स्वतः ही चांगली बातमी सांगेन.

Vicky Kaushal And Katrina Kaif (Photo Credits-Instagram)

Vicky Kaushal On Katrina Kaif Pregnancy Rumours: बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) च्या प्रेग्नेंसीबद्दल बऱ्याच दिवसांपासून चर्चा होत आहे. जेव्हा कतरिना कैफ तिचा पती विकी कौशल (Vicky Kaushal) सोबत लंडनमध्ये दीर्घ सुट्टी एन्जॉय करत होती, तेव्हा तिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यात अभिनेत्रीला पाहून सगळे म्हणत होते की, ती प्रेग्नंट आहे. आता कतरिना कैफचा पती विकी कौशलने पत्नीच्या प्रेग्नेंसीबाबत मौन तोडले आहे.

विकी कौशल सध्या त्याचा आगामी चित्रपट 'बॅड न्यूज'च्या प्रमोशनमध्ये खूप व्यस्त आहे. पत्नी कतरिना कैफच्या प्रेग्नेंसीच्या अफवांवर विकी कौशल बोलला आहे. नुकतेच एका कार्यक्रमात त्याने सांगितले की, या वृत्तांमध्ये काहीही तथ्य नाही, पण वेळ आल्यावर मी स्वतः ही चांगली बातमी सांगेन. (हेही वाचा -Tripti Dimri And Vicky Kaushal New Movie: विकी कौशल आणि तृप्ती डिमरी लवकरच दिसणार चित्रपटात, आनंद तिवारी करणाचे चित्रपटाचे दिग्दर्शन)

जेव्हा अभिनेत्याला विचारण्यात आले की, तो 16 जुलै रोजी कतरिनाचा वाढदिवस कसा साजरा करणार? यावर अभिनेता म्हणाला, हा खूप खास दिवस आहे. आम्ही एकत्र काही दर्जेदार वेळ घालवण्याचा विचार करत आहोत. मी बऱ्याच दिवसांपासून चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. जेव्हा अभिनेत्याला कतरिनाच्या प्रेग्नेंसीबद्दल विचारण्यात आले तेव्हा अभिनेता म्हणाला, जेव्हाही असे होईल तेव्हा आम्ही आनंदाची बातमी सांगू आणि सर्वांना आनंदी करू. परंतु तोपर्यंत त्यात कोणतेही तथ्य नाही आणि ही केवळ अफवा आहे. (Sam Bahadur Teaser: बहुचर्चित सॅम बहादूर चित्रपटाचा धमाकेदार टीझर आऊट, विकी कौशल दिसला नव्या अवतारात)

विकी कौशलच्या चित्रपटातील तौबा तौबा हे गाणे रिलीज करण्यात आले. या गाण्यात विकी कौशलने आपल्या डान्स मूव्ह्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हे गाणे सर्वांनाच खूप आवडते. या चित्रपटाच्या अनोख्या कथेमुळे लोकांमध्ये याबद्दलची उत्सुकता वाढली आहे. हा चित्रपट 19 जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif