सुशांत सिंह राजपूत याच्या आत्म्याशी बोलल्याचा हफ पॅरानॉर्मल च्या स्टीव हफ यांचा दावा; लवकरच फॉलो अप करणार, Watch Video

ज्यात ते सांगत आहे की, त्यांना अनेक लोकांकडून मेसेजेस आले की त्यांनी सुशांतच्या आत्म्याशी संपर्क साधावा. त्यानंतर त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या एका खास यंत्राद्वारे सुशांतशी बोलले देखील.

Sushant Singh Rajput And Steve Huff (Photo Credits: Instagram/Twitter)

बॉलिवूडचा हरहुन्नरी कलाकार सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या आत्महत्येमुळे चाहत्यांच्या मनात निर्माण झालेले अनेक प्रश्न अनुत्तरितच राहिले आहेत. यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या सुशांतची आत्महत्या त्याच्या चाहत्यांना न पटणारी गोष्ट आहे. त्याच्या आत्महत्येमागचे कारण ते गूढ हे सुशांतच सांगू शकतो असे अनेकांना वाटतय. म्हणूनच हफ पेरानॉर्मल (Huff Paranormal)चालवणारे स्टीव हफ (Steve Huff) हे सुशांतच्या आत्म्याच्या बोलत असल्याचा दावा करत आहेत. त्याच्या आत्म्याशी बोलून या आत्महत्येमागचे गूढ शोधून काढण्याचा प्रयत्न करणार आहेत त्यासाठी लवकरच ते फॉलोअप करतील असेही त्यांनी सांगितले आहे.

यासंदर्भातील एक व्हिडिओ त्यांनी सोशल मिडियावर शेअर केला आहे. ज्यात ते सांगत आहे की, त्यांना अनेक लोकांकडून मेसेजेस आले की त्यांनी सुशांतच्या आत्म्याशी संपर्क साधावा. त्यानंतर त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या एका खास यंत्राद्वारे सुशांतशी बोलले देखील.

हेदेखील वाचा- सुशांत सिंह राजपूत प्रकरणी CBI चौकशीची गरज नाही- गृहमंत्री अनिल देशमुख

पाहा व्हिडिओ:

या व्हिडिओमध्ये ते सुशांतच्या आत्म्याशी बोलत आहे.जिथे सुशांत सांगत आहे की, माझे चाहते माझ्यावर प्रचंड प्रेम करतात. त्यानंतर शेवटी एका महिलेचा आवाज येतोत, जी सांगतेय, 'हे आता शेवट होत आहे.'

स्टीव सुशांतच्या चाहत्यांना आश्वासन देत आहे की, लवकरच ते या गोष्टीचा पाठपुरावा करतील. या आधी स्टीव ने मायकल जॅकसन आणि पॅट्रिक स्वेज यांच्या आत्म्याशी देखील बोलल्याचा दावा केला होता. मात्र यात किती तथ्य आहे याबाबत आम्हाला माहिती नाही.