ह्रितिक रोशन, टायगर श्रॉफ यांच्या 'War' सिनेमाने Tamil Rockers वर लीक होऊनही 3 दिवसात कमावले 100 कोटी
यामुळे सिनेमाच्या बॉक्स ऑफिस वरील कमाई ला जबर फटका बसण्याची शक्यता होती, मात्र ही शक्यता खोटी ठरवत तीन दिवसातच सिनेमाने अवघ्या तीन दिवसातच 100 कोटींचा व्यापार केला आहे.
टायगर श्रॉफ Tiger Shroff) आणि हृतिक रोशन (Hritik Roshan) मधील 'वॉर' (War) सिनेमा तामिळ रॉकर्स (Tamil Rockers) या कुख्यात पायरसी (Piracy) वेबसाईटवर सिनेमा लीक झाला होता . वास्तविक यामुळे सिनेमाच्या बॉक्स ऑफिस वरील कमाई ला जबर फटका बसण्याची शक्यता होती, मात्र ही शक्यता खोटी ठरवत सिनेमाने रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई केली आहे. हा सिनेमा हिंदी, तामिळ आणि तेलगू भाषेत प्रदर्शित करण्यात आला होता. आतपर्यंत यापैकी हिंदी सिनेमाने 96 कोटींची कमाई केली आहे तर तामिळ आणि तेलगू भाषेतील सिनेमाने मिळून वॉर ने अवघ्या तीन दिवसातच 100 कोटींचा व्यापार केला आहे.
बॉक्स ऑफिस वरील वॉर सिनेमाचे कलेक्शन पाहता हा आतापर्यंतचा पहिल्याच दिवशी सर्वाधिक (53.35 कोटी) कमावणारा पहिला चित्रपट ठरला आहे. तसेच ऑस्ट्रेलियामध्ये २०१९ मधील सवर्वधिक कामे करणारा पहिला हिंदी सिनेमा, ह्रितिक रोशन आणि टायगर श्रॉफ या दिघाच्याही करिअरमहंडील सर्वात मोठे ओपनिंग व सर्वात मोठा फेस्टिव्हल रिलीझ ठरला आहे. यामुळे वॉर सिनेमाने प्रश्नापासूनच 5 नवे विक्रम आपल्या नावे केले आहेत. War Meta Review : जाणून घ्या टायगर आणि हृतिकमधील 'वॉर' आहे तरी कसा?
वॉर चित्रपट हा 2 ऑक्टोबर रोजी एकाच दिवशी एकाचवेळी देशभरात 5 हजार 350 स्क्रीन्सवर प्रदर्शित करण्यात आला होता. तत्पूर्वी, सिनेमाचे ट्रेलर, जय जय शिव शंकर यासारख्या गाण्यांमुळे प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण करण्यात आली होती, याशिवाय साहजिकच या सिनेमामध्ये बॉलिवूडचे हॅण्डसम हिरोज टायगर श्रॉफ आणि ह्रितिक रोशन यांनी पहिल्यांदाच एकत्र काम केल्यामुळे दोघांचेही चाहते प्रदर्शनाची वाट बघत होते.
सिनेमाच्या कथानकाबद्दल सांगायचे झाल्यास, वॉर चित्रपटात हृतिक रोशन स्पेशल एजंट कबीरच्या भूमिकेत दिसत आहे तर टायगर श्रॉफ त्याच्या ज्युनिअर अर्थात खालिदची भूमिका साकारत आहे. कथानकानुसार खालिद कबीरचा शोध घेण्यासाठी निघतो आणि दोघं समोर आल्यावर त्यांच्यात का आणि कशा पद्धतीने वॉर होतो हे या सिनेमात पाहायला मिळेल.यामध्ये आक्षण आणि रोमान्सची अचूक सांगड घातल्याने बॉलिवूड प्रेमींसाठी ही एक पर्वणी आहे.