हृतिक रोशन याचे आजोबा आणि चित्रपट निर्माते जे. ओम प्रकाश यांचे निधन
ओम प्रकाश यांचे आज (7 ऑगस्ट) रोजी निधन झाले. ते 92 वर्षांचे होते.
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) याचे आजोबा जे. ओम प्रकाश (J Om Prakash) यांचे आज (7 ऑगस्ट) रोजी निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. अभिनेता हृतिक रोशन याची आई पिंकी रोशन यांचे ते वडील होते. जे. ओम प्रकाश हे बॉलिवूड निर्माते-दिग्दर्शक होते. त्यांनी अनेक सिनेमांच्या दिग्दर्शनासोबतच निर्मिती सुत्रंही उत्तमरित्या सांभाळली. (राकेश रोशन यांना कॅन्सरचे निदान; हृतिकने शेअर केली भावनिक पोस्ट)
खुद्द हृतिक रोशन याने भावनिक पोस्ट करत आजोबांच्या निधनाची बातमी दिली आहे. यातून हृतिक रोशन याच्या आयुष्यातील त्याच्या आजोबांचे स्थान महत्त्वाचे होते, हे स्पष्ट होते.
हृतिकने पोस्टमध्ये लिहिले की, "माझे नाना, ज्यांना मी प्रेमाने डेडा म्हणत असे. त्यांनी मला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर जे काही शिकवले ते मी आता माझ्या मुलांसोबत शेअर करत आहे."
हृतिक रोशन याची पोस्ट:
'भगवान दादा', 'अपर्ण', 'आस पास', 'आशा', 'अफसाना दिलवालों का', 'आदमी खिलौना है', 'आदमी और अफसाना' यांसारख्या सिनेमाचे दिग्दर्शन त्यांनी केले होते. त्याचबरोबर 'आस का पंछी', 'आई मिलन की बेला', 'आया सावन झुम के', 'ऑखो ऑखो मे', 'आन मिलो सजना' हे त्यांचे सिनेमे चांगलेच गाजले.