Coronavirus Outbreak: कोरोना व्हायरसमुळे हिंदी चित्रपट सृष्टीचं 800 कोटी रुपयांचं नुकसान

जगभरात दहशत निर्माण केलेल्या कोरोना व्हायरसमुळे देशाला मोठं नुकसान सहन करावं लागत आहे. कोरोना विषाणुमुळे मनोरंजन क्षेत्रालाही मोठा फटका बसला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक चित्रपटांचं चित्रीकरण रद्द करण्यात आलं आहे. तसेच या महिन्यात प्रदर्शित झालेल्या चित्रपटांनाही कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. कोरोना विषाणूमुळे बॉलिवूडला 800 कोटींचं नुकसान झालं आहे. यासंदर्भात मुंबई मिररने वृत्त प्रकाशित केले आहे.

Coronavirus Outbreak: कोरोना व्हायरसमुळे हिंदी चित्रपट सृष्टीचं 800 कोटी रुपयांचं नुकसान
बागी ३, अंग्रेजी मीडिअम (PC - Twitter)

Coronavirus Outbreak: जगभरात दहशत निर्माण केलेल्या कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) देशाला मोठं नुकसान सहन करावं लागत आहे. कोरोना विषाणुमुळे मनोरंजन क्षेत्रालाही मोठा फटका बसला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक चित्रपटांचं चित्रीकरण रद्द करण्यात आलं आहे. तसेच या महिन्यात प्रदर्शित झालेल्या चित्रपटांनाही कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. कोरोना विषाणूमुळे बॉलिवूडला 800 कोटींचं नुकसान झालं आहे. यासंदर्भात मुंबई मिररने वृत्त प्रकाशित केले आहे.

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान, गुजरात, बिहार, पंजाबमधील 3 हजार 500 हून अधिक चित्रपटाच्या स्क्रिन्स बंद ठेवण्यात येणार आहेत. गेल्या आठवड्यात इरफानचा 'अंग्रेजी मीडिअम' तसेच टायगर श्रॉफचा 'बागी ३' चित्रपट प्रदर्शित झाला. 'अंग्रेजी मीडिअम' चित्रपटाने केवळ 9.5 कोटी रुपयांची कमाई केली. तसेच 'बागी ३' सिनेमाला 20 ते 25 कोटी रुपयांचं नुकसान सहन करावं लागलं. याशिवाय अनेक चित्रपटाने आपल्या चित्रपट प्रदर्शनाच्या तारखा पुढे ढकलल्या. (हेही वाचा - केरळमध्ये डॉक्टरला कोरोना व्हायरसची लागण; तब्बल 30 डॉक्टर निरीक्षणाखाली)

दरम्यान, रविवारी भारतातील चित्रपट संघटनांनी 31 मार्चपर्यंत चित्रीकरण बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात चित्रपट, टीव्ही मालिका, वेब सीरिज आणि जाहिरात असे कोणत्याही प्रकारचे चित्रीकरण होणार नाही. त्यामुळे बॉलिवुडला कोरोना विषाणुमुळे तब्बल 800 कोटींचं नुकसान सहन करावं लागणार आहे.

(The above story first appeared on LatestLY on Mar 16, 2020 06:44 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).