HC Issues Notice to Kangana Ranaut: कंगना राणौतचे संसद सदस्यत्व धोक्यात; कोर्टाने पाठवली नोटीस, जाणून घ्या काय आहे प्रकरण
या याचिकेत लायक राम नेगी यांनी कंगनाची निवडणूक रद्द करावी, अशी विनंती न्यायालयाला केली आहे.
HC Issues Notice to Kangana Ranaut: बॉलिवूड अभिनेत्री आणि मंडी, हिमाचल येथील भाजप खासदार कंगना रणौतच्या (Kangana Ranaut) सदस्यत्वाविरोधात हिमाचल उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत कंगनाचे संसद सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. या याचिकेवर उच्च न्यायालयाने कंगनाला नोटीसही बजावली आहे. उच्च न्यायालयाने कंगनाला 21 ऑगस्टपर्यंत उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे.
याचिकाकर्ते लायक राम नेगी यांनी कंगनाच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी कोर्टाकडे कंगनाची निवडणूक रद्द करण्याची मागणी केली आहे. नायक हे वनविभागाचे माजी कर्मचारी आहेत.त्यांना वेळेपूर्वी व्हीआरएस आला होता. नेगी म्हणतात की, त्यांना निवडणूक लढवायची होती पण मंडी निवडणूक अधिकाऱ्याने त्यांचा उमेदवारी अर्ज चुकीच्या पद्धतीने नाकारला.
आपला उमेदवारी अर्ज स्वीकारला असता तर ते निवडणूक जिंकले असते, असा युक्तिवाद नेगी यांनी केला आहे. या याचिकेत लायक राम नेगी यांनी कंगनाची निवडणूक रद्द करावी, अशी विनंती न्यायालयाला केली आहे. नेगी यांनी या याचिकेत त्यांनी मंडीच्या जागेवर पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी केली आहे. (हेही वाचा; West Bengal Scraps NEET: पश्चिम बंगाल विधानसभेत 'नीट' विरोधात ठराव मंजूर; राज्य सरकार सादर करणार नवीन वैद्यकीय प्रवेश परीक्षा)
अहवालानुसार, नेगी यांनी सांगितले की, नामांकनादरम्यान त्यांना सांगण्यात आले होते की, त्यांना सरकारी निवासासंबंधी वीज, पाणी आणि टेलिफोनसाठी कोणतेही न थकीत प्रमाणपत्र द्यावे लागेल. हे प्रमाणपत्र देण्यासाठी त्यांना दुसऱ्या दिवशीपर्यंतची मुदत देण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी त्यांनी रिटर्निंग ऑफिसरकडे कागदपत्रे दिली असता, त्यांनी ती स्वीकारण्यास नकार देत उमेदवारी नाकारली. कंगनाने हिमाचलमधील मंडी येथून लोकसभा निवडणूक जिंकली होती. तिने काँग्रेसचे उमेदवार विक्रमादित्य सिंह यांचा 74,755 मतांनी पराभव केला. विक्रमादित्य हे राज्य सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्रीही आहेत.