Happy Eid Mubarak 2019: अमिताभ बच्चन, हेमा मालिनी, वरुण धवन यांच्यासह दिग्गज कलाकारांनी दिल्या 'ईद' च्या शुभेच्छा
Bollywood Celebs (Photo Credits-Instagram)

Happy Eid Mubarak 2019: आज देशभरात 'ईद' चा सण साजरा केला जात असून मुस्लिम बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. रमजान मधील पाक महिना 4 जून रोजी पूर्ण झाला असून आज भारतासह जगभरातील विविध देशात ईदचा सण साजरा करण्यात येत आहे. ईद-उल-फितर याचे एक विशिष्ट महत्व असते. आज सकाळपासून मुस्लिम बांधव एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देत आहेत. याच पार्श्वभुमीवर बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांनी आपल्या चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन, वरुण धवन. सुष्मिता सेन, कतरिना कैफ, हेमा मालिनी यांच्यासह अन्य दिग्गज कलाकारांनी आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरुन ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

आप सबको चाँद मुबारक 🌙

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

तसेच आजच्या दिवशी सलमान खान आणि कतरिना यांचा चित्रपट भारत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच ईदचा दिवस असल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण दिसून येणार असून मोघलाई जेवणाचा आस्वाद घ्यायला मिळणार आहे.