Gyanpith Puraskar 2023: गीतकार गुलजार यांना 2023 चा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर
गुलजार यांना उर्दू साहित्य आणि हिंदी चित्रपटांमधील योगदानासाठी 2002 मध्ये उर्दूसाठी साहित्य अकादमी पुरस्कार, 2013 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार, 2004 साली पद्मभूषण आणि कमीत कमी पाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देण्यात आले आहेत.
कवी आणि गीतकार गुलजार (Gulzar) आणि संस्कृत विद्वान जगद्गुरू रामभद्राचार्य यांना 2023 चा ज्ञानपीठ पुरस्कार (Gyanpith Award 2023) जाहीर झाला आहे. याबाबत निवड समितीने ही माहिती दिली आहे. हे दोघेही आपापल्या क्षेत्रात खूप प्रसिद्ध आहेत. अनेक चित्रपटांमध्ये गाणी लिहिण्यासोबतच गुलजार यांनी गझल आणि कविता क्षेत्रात नावलौकिक मिळवलं आहे. तर जगद्गुरु रामभद्राचार्य (Rambhadracharya) हे संस्कृत भाषा आणि वेद आणि पुराणांचे महान अभ्यासक आहेत. ज्ञानपीठ समितीने एका निवेदनात म्हटले आहे की, हा पुरस्कार (2023 साठी) दोन भाषांमधील प्रख्यात लेखक, संस्कृत साहित्यिक जगद्गुरू रामभद्राचार्य आणि प्रसिद्ध उर्दू साहित्यिक गुलजार यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पाहा पोस्ट -
गुलजार यांना हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या कामासाठी ओळखले जाते आणि ते उर्दूतील उत्कृष्ट कवींपैकी एक मानले जातात. यापूर्वी, गुलजार यांना उर्दू साहित्य आणि हिंदी चित्रपटांमधील योगदानासाठी 2002 मध्ये उर्दूसाठी साहित्य अकादमी पुरस्कार, 2013 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार, 2004 साली पद्मभूषण आणि कमीत कमी पाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देण्यात आले आहेत.
चित्रकूटमधील तुलसी पीठाचे संस्थापक आणि प्रमुख रामभद्राचार्य हे प्रसिद्ध हिंदू आध्यात्मिक नेते, शिक्षक आणि 100 हून अधिक पुस्तकांचे लेखक आहेत. ज्ञानपीठ निवड समितीने सांगितले की, "हा पुरस्कार (2023 साठी) दोन भाषांमधील नामवंत लेखकांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे: संस्कृत साहित्यिक जगद्गुरू रामभद्राचार्य आणि प्रसिद्ध उर्दू साहित्यिक गुलजार."