Ghamand Kar Song in Tanhaji: मराठ्यांच्या अंगात सळसळत रक्त निर्माण करणारे अजय देवगणच्या अंदाजातील तानाजी चित्रपटातील 'घमंड कर' गाणे एकदा नक्की पाहा; Watch Video

या गाण्याचे संगीत आणि आणि अजय देवगण (Ajay Devgan) चा दमदार अंदाज हे या गाण्याचे वैशिष्ट्य आहे. या चित्रपटात अजय सह काजोल (Kajol), सैफ अली खान (Saif Ali Khan), शरद केळकर (Sharad Kelkar) प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

Tanhaji Song (Photo Credits: YouTube)

गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेला 'तानाजी: द अनसंग वॉरियर' (Tanhaji: The Unsung Warrior) या चित्रपटातील एकाहून एक सरस गाणी प्रदर्शित होत आहे. नुकतच या चित्रपटातील नवीन गाणे प्रदर्शित झाले आहे. अंगावर काटा आणणारे आणि मराठ्यांच्या धमन्यांत सळसळत रक्त निर्माण करणारे 'घमंड कर' हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आल आहे. या गाण्याचे संगीत आणि आणि अजय देवगण (Ajay Devgan) चा दमदार अंदाज हे या गाण्याचे वैशिष्ट्य आहे. या चित्रपटात अजय सह काजोल (Kajol), सैफ अली खान (Saif Ali Khan), शरद केळकर (Sharad Kelkar) प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. सचेत टंडन आणि परंपरा ठाकूर यांच्या आवाजात हे गाणे स्वरबद्ध करण्यात आले आहे.

हे गाणे अनिल वर्मा यांनी लिहिले असून सचेत आणि परंपरा यांनी या गाण्याला संगीत दिले आहेत. पाहा हे दमदार गाणे

हेदेखील वाचा- Maay Bhavani Song in Tanhaji: अजय-काजोल या जोडीचा मराठमोळा अंदाज आणि सुंदर नृत्याविष्कार पाहा तानाजी चित्रपटातील 'माय भवानी' या गाण्यातून, Watch Video

ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटात अजय देवगण आणि सैफ अली खान ही जोडी तब्बल 13 वर्षांनंतर एकत्र येणार आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. 13 वर्षांपूर्वी हे दोघे 'ओमकारा' चित्रपटात एकत्र दिसले होते.

मुघलांवर मराठ्यांची सर्जिकल स्ट्राईक या विषयावर ही कथा आहे. त्यात कोंढाणा किल्ला जिंकल्यासाठी मराठा योद्धा तानाजी मालुसेर यांनी लावलेली प्राणांची बाजी याचा ऐतिहासिक प्रवास यातून मांडण्यात आला आहे. येत्या 10 जानेवारी 2020 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.