Aryan Khan च्या सुटकेसाठी गौरी खानची शपथ, मुलगा घरी येई पर्यंत खाणार नाही गोड
कोर्टाने त्याच्या जामिनाच्या याचिकेवर आता 20 ऑक्टोंबर पर्यंत निर्णय राखून ठेवला आहे.
ड्रग्ज प्रकरणी (Drugs Case) अटकेत असलेल्या आर्यन खान (Aryan Khan) याला कोर्टाकडून अद्याप दिलासा मिळालेला नाही. कोर्टाने त्याच्या जामिनाच्या याचिकेवर आता 20 ऑक्टोंबर पर्यंत निर्णय राखून ठेवला आहे. आर्यन खान याच्या सुटकेसाठी दिवस लांबवणीवर जात असल्याचे दिसून येत आहे. आर्यन खानच्या अटकेमुळे संपूर्ण परिवार अत्यंत त्रस्त आहे. सध्याच्या कठीण काळातून बाहेर पडण्यासाठी आई गौरी खान हिने नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर शपथ घेतली आहे.
गौरी खान हिने आर्यन घरी सुटून येत नाही तो पर्यंत गोड खाणार नसल्याचे म्हटले आहे. याबद्दल गौरी खान हिच्या परिवारातील एका मित्राने म्हटले की, आर्यन खान याला बेल मिळत नसल्याने गौरी ही खुप चिंतेत आहे. अशातच तिने देवीला साकडे घातले आहे. तिने नवरात्रीच्या वेळी प्रार्थना करत म्हटले की, आर्यन खान घरी येत नाही तोवर गोड पदार्थांना हात सुद्धा लावणार नाही.(Cruise Ship Raid Case: एनसीबीचा साक्षीदार किरण गोसाई याच्या विरोधात लूकआउट नोटीस जारी)
वास्तविक असे मानले जाते की जेव्हा तुम्ही व्रत मागता तेव्हा तुम्हाला तुमच्या एका आवडत्या गोष्टीचा त्याग करावा लागतो. अशा परिस्थितीत गौरी खानने गोड जेवण सोडले आहे. या जवळच्या मित्राने पुढे पोर्टलला सांगितले की शाहरुखने त्याच्या सर्व मित्रांना त्याच्या घरी येऊ नये अशी विनंती केली आहे. जरी सलमान खान आतापर्यंत अनेक वेळा नवस करायला गेला आहे. त्याच्या कठीण काळात तो किंग खानसोबत उभा आहे.
तसे, आर्यन खान आर्थर रोड जेलमध्ये आहे. अहवालानुसार, आर्यनला कारागृहात नावाने नाही तर कैदी क्रमांक N956 ने बोलावले जाते. तर आर्यनला तुरुंगाचे अन्न खाण्यात खूप त्रास होत आहे. अशा परिस्थितीत कुटुंबाच्या वतीने पैसे पाठवण्यात आले आहेत. जेणेकरून तो कॅन्टीनमध्ये शिजवलेले अन्न खाऊ शकेल.