Border 2: ‘गदर 2’नंतर आणखी एका सिक्वेलमध्ये झळकणार सनी देओल
गदर 2 या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतले असून अवघ्या 8 दिवसांत 304 कोटींची कमाई केली आहे. ‘गदर 2’ला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर ‘बॉर्डर’चे दिग्दर्शक जे.पी.दत्ता हे ‘बॉर्डर 2’च्या तयारीला लागले आहेत.
सनी देओलच्या ‘गदर 2’ने बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कामगिरी सुरू आहे. गदर 2 ने एका आठवड्यातच 300 कोटींचा पल्ला गाठला आहे. एकंदरीत बॉक्स ऑफिसवर सिक्वेलची धमाकेदार कमाई सुरू आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अशातच, सनी देओलच्या चाहत्यांसाठी आणखी एक गुड न्यूज येत आहे. ‘गदर 2’ च्या घवघवीत यशानंतर सनी देओलच्या ‘बॉर्डर 2’ची चर्चा सुरू झाली आहे. ‘गदर 2’ला मिळालेल्या घवघवीत यशानंतर, सनी देओल, सुनील शेट्टी आणि जॅकी श्रॉफ स्टारर ब्लॉकबस्टर ‘बॉर्डर’ चित्रपटाबद्दल एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
गदर 2 या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतले असून अवघ्या 8 दिवसांत 304 कोटींची कमाई केली आहे. ‘गदर 2’ला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर ‘बॉर्डर’चे दिग्दर्शक जे.पी.दत्ता हे ‘बॉर्डर 2’च्या तयारीला लागले आहेत. जे.पी.दत्ता दिग्दर्शित ‘बॉर्डर’ चित्रपट 1997 मध्ये प्रदर्शित झाला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत ‘बॉर्डर’ला खूप यश मिळाले होते
बार्डर चित्रपटात सनी देओलने एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याचे पात्र साकारले होते. चित्रपटात सनी देओलसह सुनील शेट्टी, जॅकी श्रॉफ, पुनीत इस्सार आणि अक्षय खन्नासह अनेक दिग्गज सेलिब्रिटी मुख्य भूमिकेत होते. अनेक वर्षांनंतर सनी देओल पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर कमबॅक करीत आहे. ‘बॉर्डर’मध्ये सुपरहिट वॉर ड्रामा दाखवण्यात आला होता, चित्रपटाची कथा 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धावर बेतली होती. कथेमुळेच बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने चांगल्ला गल्ला जमावला होता.
(The above story first appeared on LatestLY on Aug 20, 2023 11:37 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

