Gadar 2 Box Office Collection: गदर 2 ची 10 व्या दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई, 400 कोटीकडे वाटचाल

रविवारी चित्रपटाने देशभरातील बॉक्स ऑफिसवर 41 कोटींचा गल्ला जमवला आहे. त्यासह चित्रपटाने 10 व्या दिवशी संपूर्ण देशात 377.20 कोटींचे कलेक्शन केले आहे. '

Gadar 2 Box Office Collection: गदर 2 ची 10 व्या दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई, 400 कोटीकडे वाटचाल
Gadar 2 Poster (PC- Twitter)

सनी देओलचा चित्रपट 'गदर 2' हा सध्या बॉक्स ऑफिस धुमाकुळ घालत आहे. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन 10 दिवस झाले असले तरी या चित्रपटाची जोरदार कमाई ही सुरुच आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन 10 दिवस झाले आहेत. पण चित्रपटाचे कलेक्शन पहिल्या दिवसापेक्षा जास्त आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने 40.1 कोटींची कमाई करत सुरुवात केली. एवढ्या तीन दिवसात या चित्रपटाने 100 कोटींचा आकडा पार केला. पहिल्या 3 दिवसात चित्रपटाने एकूण 134.88 कोटींचे कलेक्शन केले. चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यापासून नवीन रेकॉर्ड बनवायला सुरुवात केली. दुसऱ्या आठवड्याच्या वीकेंड चित्रपटाने दमदार कामगिरी केली आहे.

रविवारी चित्रपटाने देशभरातील बॉक्स ऑफिसवर 41 कोटींचा गल्ला जमवला आहे. त्यासह चित्रपटाने 10 व्या दिवशी संपूर्ण देशात 377.20 कोटींचे कलेक्शन केले आहे. 'गदर 2'ने शुक्रवारी देशभरात 20 कोटींपेक्षा जास्त कलेक्शन केले. तर दुसऱ्या शनिवारी या चित्रपटाचे कलेक्शन 31.07 कोटी झाले. 10व्या दिवशी म्हणजे रविवारी 'गदर 2' चित्रपटाने 350 कोटींचा आकडा पार केला आहे.

सनी देओलचा चित्रपट बॉक्स ऑफिस घवघवीत यश मिळवत आहे, तर दुसरीकडे त्याची प्रॉपर्टी लिलावात काढण्यात आली आहे. सनी देओलवर बँकेचे खूप कर्ज आहे. त्यामुळे बँकेने रिकव्हरीसाठी त्याची मुंबईतील प्रॉपर्टीचा लिलाव होत असल्याची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

(The above story first appeared on LatestLY on Aug 21, 2023 12:16 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).