FIR Against Kamaal R Khan: दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्याविषयी अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल, कमाल आर खान विरोधात एफआयआर दाखल

गेल्या महिन्यात कर्करोगाने या दोन्ही दिग्गजांचे निधन झाले.

Kamaal R Khan (Photo Credits: Twitter)

देशावर कोरोना व्हायरसचे (Coronavirus) संकट असताना, भारतीय चित्रपट सृष्टीने इरफान खान (Irrfan Khan) व ऋषी कपूर (Rishi Kapoor) असे दोन मोठे कलाकार गमावले. गेल्या महिन्यात कर्करोगाने या दोन्ही दिग्गजांचे निधन झाले. आता ऋषी कपूर आणि इरफान खान या दिवंगत कलाकारांविरोधात सोशल मीडियावर अपमानजनक टिप्पणी केल्याबद्दल, अभिनेता कमाल आर खान (Kamaal R Khan) याच्याविरोधात वांद्रे  (Bandra) येथे एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे. एका अधिकाऱ्याने याबाबत सांगितले की, युवा सेनेच्या कोअर कमिटीचे सदस्य राहुल कनाल (Rahul Kanal) यांनी अभिनेत्यांबाबतच्या अपमानास्पद ट्विटवर तक्रार दाखल केली होती, त्या आधारे बुधवारी एफआयआर दाखल करण्यात आला.

30 एप्रिल रोजी खानने ट्विटरवर ऋषी कपूर यांच्या रुग्णालयात भरतीची कथित घोषणा केली होती आणि म्हटले होते की, लवकरच दारूची दुकाने सुरू होणार असल्याने ऋषी कपूर यांचा मृत्यू नको व्हायला हवा होता. याबाबत अधिकारी म्हणाले की, कमल आर खानने 28 एप्रिल रोजी इरफान खान यांना लक्ष्य केले होते, त्यानंतर दुसर्‍याच दिवशी इरफान खान यांचे निधन झाले. (हेही वाचा: अशोक सराफ व निवेदिता जोशी यांनी खास आमरस-पुरी खाऊ घालून मानले पोलिसांचे आभार)

एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, ‘आम्ही कमाल आर खान याच्याविरोधात आयपीसीच्या संबंधित कलमांतर्गत दोन्ही निधन झालेल्या अभिनेत्यांविरूद्ध, अवमानकारक टिप्पणी केल्याबद्दल एफआयआर दाखल केला आहे. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.’ दरम्यान, ऋषी कपूर यांचे 30 एप्रिल रोजी निधन झाले. त्याच्या एक दिवस आधी म्हणजे, 29 एप्रिल रोजी इरफान खान यांचे निधन झाले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif