Pan Masala Ad: अमिताभ बच्चन, रणवीर सिंह, अजय देवगण आणि शाहरुख खान यांच्यावर गुन्हा दाखल; पान मसाला जाहिरातीमुळे वाढल्या अडचणी

बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये राहणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी या सर्व अभिनेत्यांवर हा गुन्हा दाखल केला आहे.

Amitabh Bachchan, Ranveer Singh, Ajay Devgn, Shah Rukh Khan (PC - Facebook)

Pan Masala Ad: बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), अजय देवगण (Ajay Devgn), किंग खान शाहरुख (Shah Rukh Khan) आणि रणवीर सिंग (Ranveer Singh) यांच्याविरोधात एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा एफआयआर पान मसाल्याच्या जाहिरातीबाबत चौघांवर करण्यात आला आहे. बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये राहणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी या सर्व अभिनेत्यांवर हा गुन्हा दाखल केला आहे.

सामाजिक कार्यकर्त्या तमन्ना हाश्मी यांनी रणवीर सिंग, अजय देवगण, शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांच्याविरोधात कलम 467, 468, 439 आणि 120 बी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्याचवेळी या चारही स्टार्सवर पैशाच्या लोभापोटी स्टारडमचा गैरवापर केल्याचा आरोपही आरोपपत्रात करण्यात आला आहे. त्याचवेळी, एका वृत्तानुसार, या प्रकरणाची सुनावणी 27 मे रोजी होणार आहे. (हेही वाचा - Cannes 2022: नग्न अवस्थेत रेड कार्पेटवर पोहोचली युक्रेनियन महिला; शरीरावर लिहिलं होतं, 'आमचा बलात्कार थांबवा')

तमन्नाने सांगितले की, या स्टार्सनी त्यांच्या लोकप्रियतेचा पुरेपूर फायदा घेतला आहे. लहानांपासून ते वृद्धांपर्यंत या लोकांना आपला आदर्श मानतात. अशा परिस्थितीत हे स्टार्स काय करतात ते हे लोक फॉलो करतात. अशा परिस्थितीत स्टार्सच्या अशा जाहिरातींचा त्यांच्यावर चुकीचा परिणाम होईल.

दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या वाढदिवशी एक निवेदन जारी केले होते की, त्यांनी त्यांचा करार संपुष्टात आणला आहे. कमला पसंतीची जाहिरात दिल्यानंतर काही दिवसांनी कंपनीशी बोलून त्यांनी जाहिरातीसोबतचा करार संपुष्टात आणला आणि प्रमोशनची फीही परत केल्याचे त्यांनी सांगितले होते.