Don 3 Announcement: डॉन 3 चित्रपटाचं मोशन पोस्टर रिलीज, चित्रपटात मुख्य भुमिकेत रणवीर सिंग? सोशल मीडियावर रंगली चर्चा
फरहान अख्तरने सोशल मीडियावर या संदर्भात पुष्ठी केली आहे.
Don 3 Announcement: अभिनेता आणि चित्रपट निर्माता फरहान अख्तरने मंगळवारी सकाळी एक घोषणा केली आहे. 'डॉन 3' या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या संदर्भात नेटकऱ्यांना गोंधळात टाकले. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटा विषयीच्या वृत्त प्रसारित होत आहेत, दरम्यान, दिग्दर्शकाने स्वतःच या चित्रपटासंदर्भात पहिल्यांदा घोषणा केली आहे .त्यामुळे नेटकरी फार उस्ताही झाली आहे. मात्र मागील काही दिवसांपासून सोशल मिडियावर चर्चा सुरु आहेत की यावेळी डॉन 3 या चित्रपटात रणवीर सिंग हा शाहरुख खानची जागा घेणार आहे.
फरहानच्या ‘डॉन’ फ्रेंचायझीच्या पहिल्या दोन चित्रपटांमध्ये शाहरुख खान मुख्य भूमिकेत होते आणि दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरले. सोशल मीडियावर डॉन ३ चित्रपटासंदर्भात चर्चा रंगली आहे. फ्रँचायझीच्या तिसऱ्या चित्रपटात एक नवीन चेहरा असेल आणि तो रणवीर सिंग नसून दुसरा कोणीही नसावा. फरहान खानने सोशल मीडियावर डॉन ३ च्या संदर्भात एक व्हिडिओ शेअर केला आहे. मुख्य भुमिकेत कोण असेल या संदर्भा अद्याप कोणतीही घोषणा केली नाही. त्यामुळे नेटकऱ्यांना देखील या चित्रपटात मुख्य भुमिकेत कोण असणार असा प्रश्न पडला आहे.
फरहानने मंगळवारी त्याच्या सोशल मीडिया अंकाऊटवरून 'डॉन 3' च्या घोषणेची माहिती देत एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये फक्त '3' क्रमांकाचा उल्लेख आहे, आणि पुढे असे लिहिले आहे की, "एक नवीन युग सुरू होते", जे दर्शवते की फ्रँचायझी एक नवीन चेहरा मिळवण्यासाठी सज्ज आहे. डॉन चित्रपटातील डायलॉग सुपरहिट ठरले आहे.डॉन चित्रपटाने देखील प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. त्यामुळे शाहरुख खानाच्या चाहत्यांसाठी उत्सुकता लागली आहे की, डॉन 3 या चित्रपटात मुख्य भुमिकेत कोण असेल? डॉन' फ्रँचायझीच्या निर्मात्यांनी एक टीझर रिलीज करत 'डॉन 3'ची अधिकृत घोषणा केली आहे.