तंबाखूची जाहिरात न करण्याचा अजय देवगण याला चाहत्याचा सल्ला

अभिनेता अजय देवगणला त्याच्या एका चाहत्याने चक्क तंबाखूची जाहिरात न करण्याचा सल्ला दिला आहे.

Ajay Devgan (Photo Credits: Instagram and Youtube)

आपल्या दमदार अभिनयामुळे आपला वेगळा असा प्रेक्षकवर्ग निर्माण केलेल्या अभिनेता अजय देवगण याला (Ajay Devgan) त्याच्या एका चाहत्याने चक्क तंबाखूची जाहिरात न करण्याचा सल्ला दिला आहे. राजस्थानमध्ये राहणा-या ४० वर्षीय कर्करोग (Cancer) पीडित नानकराम याने अजय देवगणला ही विनंती केली आहे. हा अजय देवगणचा फार मोठा चाहता आहे.

राजस्थामध्ये राहणा-या ह्या नानकरामच्या (Nanakram) नातेवाईकांचे म्हणणे आहे की, नानकराम अजयचा चाहता असल्यामुळे तो ब-याचदा अजयद्वारे प्रमोट केलेल्या गोष्टी वापरतो. त्यामुळे अजय देवगणने केलेल्या तंबाखूची(Tabacco) जाहिरात पाहून त्याने तंबाखूचे सेवन सुरु केले. हळूहळू हे प्रमाण इतके वाढले की, त्याचा नानकरामच्या स्वास्थ्यावर विपरित परिणाम झाला. ज्याचे रुपांतर पुढे कर्करोगामध्ये झाले. त्यामुळे जे आपल्या बाबतीत घडले ते इतर कोणाबाबतीत घडू नये म्हणून, नानकरामने अजय देवगणला तंबाखूची जाहिरात करणे सोडून दे असा सल्ला दिला आहे. असेही त्याच्या मुलाने पीटीआयशी बोलताना सांगितले.

कर्करोगाचे (Cancer) निदान होण्यापूर्वी नानकराम चहाचे दुकान चालवायचा. आता तो बोलू शकत नाही. तंबाखूमुळे कर्करोग झाल्याचे कळताच नानकरामने स्वखर्चाने तंबाखूजन्य पदार्थांचे दुष्परिणाम सांगणारी एक हजार माहितीपत्रके छापून ती सर्वत्र वाटली. यानंतर त्याने अजयला अशा पदार्थांची जाहिरात न करण्याची विनंती केली. त्यामुळे एकंदरीतच अजय देवगण आपल्या चाहत्यांचे ऐकणार की नाही ह्यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.

De De Pyaar De Song Chale Aana: 'दे दे प्यार दे' सिनेमातील अजय देवगन आणि रकुल प्रीत सिंग यांचा इमोशनल ट्रॅक 'चले आना' आऊट! (Video)

अजय देवगण लवकरच आपल्याला ‘दे दे प्यार दे’ (De de Pyar De) ह्या हिंदी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ह्यात आपल्याला अजयसह तब्बू आणि रकुलप्रीत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.