Sapna Choudhary Wedding Photos: हरियाणाची प्रसिध्द डान्सर सपना चौधरीच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल
त्यानंतर सपनाने नेमकी कुणासोबत लग्न केलं? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला होता. सपनाने हरियाणाचा कलाकार वीर साहू याच्यासोबत लग्न केल्याचं उघडकीस आलं होतं. सध्या सोशल मीडियावर सपनाच्या लग्नाचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत.
Sapna Choudhary Wedding Photos: या आठवड्यात हरियाणाची प्रसिद्ध डान्सर सपना चौधरीने (Sapna Choudhary) एका गोंडस मुलाला जन्म दिल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर सपनाने नेमकी कुणासोबत लग्न केलं? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला होता. सपनाने हरियाणाचा कलाकार वीर साहू याच्यासोबत लग्न केल्याचं उघडकीस आलं होतं. सध्या सोशल मीडियावर सपनाच्या लग्नाचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत.
या फोटोमध्ये सपनाने लाल रंगाची साडी आणि पिवळ्या रंगाचा कपडा परिधान करून रीतीरिवाजात लग्न केल्याच दिसून येत आहे. सपनाच्या लग्नाचे हे फोटो आता इंटरनेटवर पाहायला मिळत आहेत. सपनाने सोशल मीडियावर कोणत्याही ठिकाणी तिच्या लग्नाचा तपशील शेअर केला नव्हता. मात्र आता मुलाच्या जन्माची बातमी समजताचं तिने यावर्षी जानेवारीत गुप्तपणे लग्न केल्याचं समोर आलं आहे. (हेही वाचा - Dhanashri Kadgaonkar Pregnant: अभिनेत्री धनश्री काडगावकरने खास व्हिडिओ द्वारा शेअर केली ‘गुड न्यूज’; लवकरच होणार आई!)
प्राप्त माहितीनुसार, कुटुंबातील सदस्याच्या निधनामुळे सपनाने आपल्या लग्नाची माहिती कोणाबरोबरही शेअर केली नाही. आता सपनाच्या लग्नाची आणि मुलाची बातमी सर्वांना सममजली आहे. त्यामुळे सपनाचे चाहते आता सोशल मीडियावर त्यांचे अभिनंदन संदेश पाठवत आहेत आणि त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत.