प्रसिद्ध अभिनेता Kamal Haasan रुग्णालयात भरती; या कारणामुळे करावी लागली शस्त्रक्रिया
हासन बहिणींनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. यात त्यांनी कमल हसन यांच्यावर शस्त्रक्रिया सुरू असल्याचं म्हटलं आहे.
दाक्षिणात्य चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेता कमल हासन (Kamal Haasan) यांना सध्या रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. यासंदर्भात कमल हासन यांच्या दोन मुली अभिनेत्री श्रुति हासन आणि अक्षरा हासन यांनी माहिती दिली आहे. हासन बहिणींनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. यात त्यांनी कमल हसन यांच्यावर शस्त्रक्रिया सुरू असल्याचं म्हटलं आहे. श्रृति हासन यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, 'वडिलासांठी आपण काळजी आणि प्रार्थना केल्याबद्दल धन्यवाद. त्यांची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे, हे सांगताना आम्हाला आनंद होत आहे. आज सकाळी श्री रामचंद्र हॉस्पिटलमध्ये ऑर्थोपेडिक डॉ. मोहन कुमार आणि डॉ. जेएसएन मूर्ती यांनी त्यांच्या पायाची शस्त्रक्रिया केली. डॉक्टर आणि रुग्णालय व्यवस्थापन आमच्या वडिलांची चांगली काळजी घेत आहेत. ते त्यांच्या चांगल्या आणि जलद पुनर्प्राप्तीसाठी काम करीत आहे.'
निवेदनात पुढे असंही म्हटलं आहे की, 'ते पुढील चार ते पाच दिवसांत घरी परत येतील. काही दिवस विश्रांती आणि शस्त्रक्रियेनंतर ते नेहमीप्रमाणे लोकांशी संवाद साधण्यास तयार असतील. त्यांच्यासाठी केलेल्या प्रार्थनेबद्दल सर्वांचे मनापासून आभार. तुमची चांगली उर्जा त्याच्या जलद पुनर्प्राप्तीचा एक मोठा भाग असेल. याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत.' इंग्रजी वेबसाइट टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, कमल हासन काही वर्षांपूर्वी अपघाताचे बळी पडले होते. ज्यामुळे त्यांना आता शस्त्रक्रिया करावी लागली. (वाचा - Tandav Controversy: तांडव सीरिजमुळे निर्माण झालेल्या वादानंतर अखेर दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी भावना दुखावण्याचा हेतू नसल्याचे म्हणत मागितली माफी)
श्रृतिने प्रसिद्ध केलेलं हे निवेदन सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कमल हासनचे अनेक चाहते त्यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत. यापूर्वी कमल हासन ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांच्या राजकारणात प्रवेश करण्याविषयी वक्तव्य केल्यामुळे चर्चेत आले होते. अलीकडेचं रजनीकांत यांनी राजकारण सोडण्याची घोषणा केली. आरोग्याचे कारण सांगून त्यांनी हा निर्णय घेतला. राजकारणाशिवाय ते पूर्वीप्रमाणेचं तामिळनाडूच्या जनतेसाठी काम करत राहतील, असं आश्वासन रजनीकांत यांनी दिलं आहे.