Exclusive! OTT प्लेटफॉर्म ला काम करणे खूप चॅलेंजिंग, आर्टिस्ट नितीन चंद्रकांत देसाई यांनी सांगितल्या 'Paurashpur' वेबसीरिजचा सेट घडविण्याचा अनुभव
म्हणून लेटेस्टली चे प्रतिनिधी प्रथम जाधव यांनी त्यांची खास मुलाखत घेतली.
ऑल्ट बालाजी (Alt Balaji) ने आतापर्यंत वेगवेगळ्या विषयाच्या वेबसीरिज प्रेक्षकांसाठी आणल्या. त्यातच आता ऑल्ट बालाजी नवी वेबसीरिज 'पौरशपूर' (Paurashpur) सध्या प्रचंड चर्चेत आले. काही दिवसांपूर्वी याचा प्रोमो प्रदर्शित झाल्यानंतर आज याचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरनंतर अनेकांची या वेबसीरिज बद्दल उत्सुकता आणखी वाढली आहे. येत्या 29 डिसेंबरला ही वेबसीरिज Zee5 वर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये 19 व्या दशकातले भव्यदिव्य सेट पाहून सर्वजण अवाक् झाले आहेत आणि हे भव्य दिव्य सेट बनविण्याची कल्पना आहे सुप्रसिद्ध आर्टिस्ट नितीन चंद्रकांत देसाई (Nitin Chandrakant Desai)... देवदास, जोधा अकबर यांसारख्या असंख्य हिट चित्रपटानंतर या वेबसीरिजमधून प्रथमच नितीन देसाईची एक वेगळी कलाकृती समोर येत आहे. म्हणून लेटेस्टली चे प्रतिनिधी प्रथम जाधव यांनी त्यांची खास मुलाखत घेतली.
या मुलाखतीदरम्यान नितीन देसाईंनी पौरशपूर या वेबसीरिजचा सेट बनवितानाचा अनुभव शेअर केला. त्याचबरोबर OTT प्लेटफॉर्मकडे त्यांचा पाहण्याचा दृष्टीकोन देखील स्पष्ट केला. यावेळी लॉकडाऊन आधी आणि लॉकडाऊन नंतर किती बदल झाला हे चित्र देखील स्पष्ट केले.
हेदेखील वाचा- Paurashpur Teaser: मिलिंद सोमण, शिल्पा शिंदे स्टारर पौरषपुर वेबसिरीजचा टीझर आऊट (Watch Video)
लॉकडाऊन दरम्यान मी अनेक दिग्दर्शकांशी फोनवरून कामाबाबत विचारणा करत होतो त्याचदरम्यान माझ्याकडे हा प्रोजेक्ट आला. वेबसीरिजसाठी काम करणे हा माझ्यासाठी पहिला अनुभव असल्याने या प्रोजेक्टला पुरेपूर न्याय देण्यासाठी आपण खूप अभ्यास आणि रिसर्च केल्याचे नितीन देसाईंनी सांगितले. पौरशपूर या वेबसीरिजसाठी सेट बनवणे हे खूपच चॅलेंजिग आणि इंटरेस्टिंग होते. वेबसीरिजचे लाइटिंग, त्याचे सेट हे खूप वेगळे असते. त्यामुळे मी स्वत:ला याबाबतीत नवखा मानून त्यानुसार या कामाला सुरुवात केली.
पौरशपूर यातील राजाच्या महालाबाबत नितीन देसाईंनी एक इंटरेस्टिंग गोष्ट देखील सांगितली. राजाच्या 240 स्केअर फूटच्या बेडरूमपासून, गार्डन, राणीचा महाल या गोष्टींसाठी टीमने मिळून खूप ते चित्र प्रत्यक्षात उतरवले. यातील काही सेक्शन्स तर खूप अफलातून झाले असून ते तुम्हाला आंतरराष्ट्रीय स्तरावर गेल्याचा प्रत्यक्षात अनुभव होईल. त्याचबरोबर OTT प्लेटफॉर्म ही पुढची काळजी गरज आहे. त्यामुळे ती गरज ओळखून तुम्ही त्यानुसार काम केले पाहिजे असा सल्ला देखील त्यांनी आर्टिस्ट म्हणून ओटीटी प्लेटफॉर्म मध्ये येणा-या तरुणांसाठी दिला.
या वेबसीरिजमध्ये अन्नू कपूर, मिलिंद सोमन, शिल्पा शिंदे, शहीर शेख, साहिल सलाथिया प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या वेबसीरिजमध्ये भद्रप्रताप सिंह ची भूमिका अन्नू कपूर दिसत आहेत. तर राणी मीरावतीची भूमिका अभिनेत्री शिल्पा शिंदे साकारत आहे.